भिंतीवरून उडी मारून पलायन करणारा आमदार ईडीच्या ताब्यात

  34

फोन नाल्यात फेकला


कोलकाता : पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने छापे टाकले. छाप्यादरम्यान सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्णा साहा यांनी भिंतीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ईडीने नाट्यमयरीत्या सोमवारी त्यांना अटक केली. यावेळी त्यांनी त्यांचे फोनही घरामागील नाल्यात फेकून दिले. नंतर अधिकाऱ्यांनी हा फोन जप्त केला.


पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील आमदार साहा यांच्या निवासस्थानी छापे टाकल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांना ताब्यात घेतले. ईडी आणि केंद्रीय राखीव पोलीस दल अधिकाऱ्यांनी झाडे आणि कचरा पसरलेल्या परिसरातून ही कारवाई करण्यात आली. बुरवान विधानसभा मतदारसंघातील आमदाराला एजन्सीला सहकार्य न केल्याबद्दल मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


दरम्यान, संबंधित आमदारांच्या काही नातेवाईक आणि सहकाऱ्यांच्या घरीही छापे टाकण्यात आले. साहा यांना २०२३ मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरोने घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक केली होती आणि नंतर त्यांची सुटका करण्यात आली. कोलकाता उच्च न्यायालयाने गट 'क' आणि 'ड' कर्मचारी, इयत्ता ९ वी ते १२वी पर्यंतचे सहाय्यक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षकांच्या भरतीतील कथित अनियमिततांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.


या प्रकरणात ईडीने आतापर्यंत पश्चिम बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी, त्यांची कथित सहकारी अर्पिता मुखर्जी, तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष माणिक भट्टाचार्य यांच्यासह काही इतरांना या प्रकरणात अटक केली. ईडीने अटक केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने चॅटर्जी यांना निलंबित केले. तपास यंत्रणेने आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपपत्रे दाखल केली आहेत.

Comments
Add Comment

जर्मन वृत्तपत्राचा मोठा दावा: ट्रम्प यांचे ४ फोन, पण पंतप्रधान मोदींनी प्रतिसाद दिला नाही

नवी दिल्ली: अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या व्यापार तणावादरम्यान एक खळबळजनक दावा समोर आला आहे. जर्मन

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत

पंतप्रधान मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या संदर्भात परराष्ट्र सचिव

उदयगिरी आणि हिमगिरी, २ निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात नौदलाने मंगळवारी आयएनएस

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र