
प्रतिनिधी:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील प्रथम सुझुकी ईव्ही कार प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. त्यावेळी सुझुकी मोटर जपानी वाहन निर्माता कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने मंगळवारी घोषणा केली की ते पुढील पाच ते सहा वर्षांत भारतात ७०००० को टी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही घोषणा करताच कंपनीच्या शेअरने २.३०% वाढ नोंदवली आहे. यावेळी येत्या ५-६ वर्षात ७०००० कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा करताना कंपनीने म्हटले आहे की,' गुंतवणुकीचा वापर उत्पादन वाढवण्यासाठी, नवीन कार मॉडेल्स सादर करण्यासाठी आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या ऑटोमोबाईल बाजारपेठेत त्यांचे नेतृत्व स्थान संरक्षित करण्यासाठी केला जाईल.' गुजरातमधील कंपनीच्या हंसलपूर प्लांटमध्ये मारुती सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही, 'ई-विटारा'च्या लाँचिंग दरम्यान सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांनी ही घोषणा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन समारंभात इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. ई-विटारा केवळ मारुती सुझुकी इंडियाच्या युनिट सुझुकी मोटर गुजरात (एसएमजी) येथे तयार केला जाईल आणि १०० हून अधिक देशांमध्ये निर्यात केला जाईल. पहिली शिपमेंट पिपावाव बंदरातून युरोपसाठी रवाना होईल, ज्यामध्ये यूके, जर्मनी, फ्रान्स, नॉर्वे, इटली आणि इतर अनेक बाजारपेठा समाविष्ट असतील.
सुझुकीने असेही म्हटले आहे केली की,' इलेक्ट्रिक एसयूव्ही जपानला निर्यात केली जाईल. तोशिहिरो सुझुकी म्हणाले की, गुजरातमधील ही सुविधा जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल हबपैकी एक म्हणून विकसित केली जात आहे ज्याची वार्षिक १० लाख युनि ट्सची नियोजित क्षमता आहे. आम्ही आमचे पहिले बॅटरी इलेक्ट्रिक वाहन, ई-विटारा तयार करण्यासाठी आणि ते जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी ही सुविधा निवडली गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आलेल्या या दिवसाला “ऐतिहासिक दिवस” म्हणून संबोधत, सुझुकीने भारताच्या हरित गतिशीलतेला चालना देण्याच्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कंपनीने कौतुक केले.'सुझुकीने चार दशकांहून अधिक काळ भारताच्या गतिशीलतेच्या प्रवासात अभिमानाने भागीदारी केली आहे आणि आम्ही शाश्वत गतिशीलतेच्या भारता च्या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विकसित भारताला योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहोत' असे कंपनीने म्हटले.
विक्री आणि महसुलाच्या बाबतीत भारत सुझुकीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे, मुख्यत्वे तिच्या बहुसंख्य मालकीच्या उपकंपनी, मारुती सुझुकी, देशातील सर्वोच्च कार निर्माता कंपनीद्वारे सुझुकीचे उलाढाल चालते. गेल्या काही वर्षांत, सुझुकीने भारतात १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे त्याच्या मूल्य साखळीत (Value Chain) ११ लाखांहून अधिक थेट नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. ई-विटारा लाँच सोबतच, कंपनीने भारतातील पहिल्या लिथियम-आयन बॅटरी आणि सेलचे उत्पादन इलेक्ट्रोड -लेव्हल लोकलायझेशनसह सुरू करून आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. हायब्रिड वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या बॅटरी आता फक्त कच्चा माल आणि काही सेमीकंडक्टर भाग जपानमधून आयात करून भारतात बनवल्या जातील. सुझुकीने म्हटले आहे की हे पाऊल 'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेने एक मजबूत पाऊल आहे आणि कंपनी कार्बन न्यूट्रॅलिटी ध्येये पूर्ण करण्यासाठी 'मल्टी-पॉवरट्रेन स्ट्रॅटेजी'चे अनुसरण करेल. यामध्ये इलेक्ट्रिक वाहने, मजबूत हायब्रिड, इथेनॉल फ्लेक्स-फ्युएल वाहने आणि कॉम्प्रेस्ड बा योगॅसचा समावेश आहे.