मुंबईत आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयाची मनाई

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे उपोषण करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाकडून मनाई करण्यात आली आहे. नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असेल, असे मुंबई हायकोर्टाचे एका जनहित याचिकेत निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबईसाठी आम्ही रवाना होणारचं असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी 27 ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मात्र त्याआधी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे.

जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली आहे. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याचवेळी, जरांगे यांना निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे, असे खंडपीठाने नमूद केले.

आम्ही कायदा, संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करु, आम्ही मुंबईत 100 टक्के जाणार, न्यायदेवतेचं पालन करु, कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करणार नाही, आमचे वकील बांधव कोर्टात जातील, न्यायदेवता न्याय देईल, असं मनोज जरांगे म्हणाले.

मुंबई उच्च न्यायालय शंभर टक्के परवानगी देणार, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. जनतेचं गाऱ्हाण न्यायदेवता ऐकेल, असंही मनोज जरांगे म्हणाले. लोकशाही मार्गाने जनता आंदोलन करु शकते. संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करतो आहे. मी 29 ऑगस्टला आझाद मैदानावर येणार आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं.

 
Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतनिधीला मंजुरी

मुंबई : अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसल्यामुळे नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक, वेळापत्रक बघून प्रवासाचं नियोजन करा

मुंबई : ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक घेणार आहे. पश्चिम रेल्वेने वसई रोड

Nitesh Rane : 'समुद्र माझा, मी समुद्राचा'! जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त वर्सोवा किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

मुंबई : जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधत आज राज्यभरात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या

एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत आंदोलनाच्या तयारीत

एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत आंदोलनाच्या तयारीत मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत पुन्हा एकदा आंदोलन

मेट्रो-३ संपूर्ण मार्गिकेसाठी तिकीट दर निश्चित

मेट्रो-३ संपूर्ण मार्गिकेसाठी तिकीट दर निश्चित मुंबई (प्रतिनिधी) : शहरातील ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या

‘ॲप’टॅक्सी भाडे प्रति किमी २२.७२ रुपये

‘ॲप’टॅक्सी भाडे प्रति किमी २२.७२ रुपये मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी मुंबई (प्रतिनिधी): अॅप आधारित