मोहित सोमण: आजपासून सत्व इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन लिमिटेड, करंट इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड, अनलोन हेल्थकेअर कंपनीचे आयपीओ बाजारात दाखल झाले आहेत. जाणून घेऊयात यात तिन्ही आयपीओविषयी इत्यंभूत माहिती....
१) Sattva Engineering Construction Limited - सत्व इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन लिमिटेडचा आयपीओ आज २६ ऑगस्टला दाखल झाला असून २९ ऑगस्टपर्यंत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने ७० ते ७५ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केला आहे. एकूण ३५.३८ कोटींचा हा एसएमई आयपीओ असून ०.४७ कोटी शेअरचा हा फ्रेश इशू असेल. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १६०० शेअर खरेदी करावे लागतील ज्यांचे एकूण मूल्यांकन २४००००. ०० रूपये असेल. Vivro Financial Service Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून MUFG Intime India Private Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. मार्केट मेकर म्हणून Ri khav Securities Limited कंपनी काम करेल. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) १ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. ३ सप्टेंबरला आयपीओ बाजारात सूचीबद्ध होणार आहे. ३५.३८ कोटी मूल्यांकनाचा हा फ्रेश इशू असून मार्केट मेकरसाठी १.८० कोटी मूल्यांकनाचे शेअर राखीव आहेत. एनएसई एसएमई (NSE SME) प्रवर्गात आयपीओ समाविष्ट केला जाईल.माहितीनुसार, गुंतवणूकदारांना किमान ३२०० शेअरची बोली (Bidding) लावावी लागणार आहे. आयपीओतील एकूण गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Buyers QIB) ८८८००० शेअर गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहेत. तर मार्केट मेकरसाठी २४०००० (७.०९%) शेअर गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतील. किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail Investors) ला एकूण ४६.२९% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल.
सतनाम शेषाद्री, आर सेकर, जगछंदर सेकर उथरा हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल (Stake) ८६.१८% होते जे आयपीओनंतर घटणार आहे. डिसेंबर २००५ साली कंपनीची स्थापना झाली होती. ही कंपनी प्रामु ख्याने इंजिनिअरिंग प्रोकरमेंट ईपीसी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या आर्थिक वर्षात कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २२% महसूल वाढला आहे. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १००% वाढ झाली आहे. मार्च २०२४ मधील कंपनीच्या ४.५६ कोटी करोत्तर नफ्यातील तुलनेत मार्च २०२५ मध्ये कंपनीला ९.१४ कोटींचा नफा मिळाला होता. तर कंपनीचा ईबीटा (EBITDA करपूर्व कमाईत) मार्च २०२४ मधील ११.७२ कोटींच्या तुलनेत वाढ होत मार्च २०२५ मध्ये १८.५६ कोटींवर पोहोचला आहे.१३१.०१ कोटी रूपये कंपनीचे सध्या बाजार भांडवल (Market Capitalisation) आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर दीर्घकालीन खेळत्या भांडवल गर जेसाठी (Working Capital Requirements) व दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी कंपनीला किती सबस्क्रिप्शन मिळाले?
पहिल्या दिवशी कंपनीला एकूण ०.६७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे तर किरकोळ गुंतवणूकदार श्रेणीकडून कंपनीला ०.८९ वेळा, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ० वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १.०३ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. स ध्या कंपनीच्या शेअरची जीएमपी (Grey Market Price GMP) १९ रूपये सुरू आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअरची जीएमपी एकूण ९४ रूपयांवर मानली जात आहे.
२) Current Infraprojects Limited- करंट इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेडचा आयपीओ आजपासून बाजारात दाखल झाला आहे. ४१.८० कोटींचा हा आयपीओ आज २६ ते २९ ऑगस्ट कालावधीत हा आयपीओ बाजारात उपलब्ध असेल. १ सप्टेंबरपर्यंत पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) होऊ शकते. माहितीनुसार, ७६ ते ८० रूपये प्रति शेअर दरावर प्राईज बँड निश्चित करण्यात आला आहे. ३ सप्टेंबरला हा शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ गुंतवणू कदारांना किमान १६०० शेअर खरेदी करावे लागतील ज्यांचे मूल्यांकन २५६०००.०० रूपये आहे. Holani Consultants Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Bigshare Services Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. मार्केट मेकर म्हणून Holani Consultants Pvt Ltd कंपनी काम करणार आहे. ४१.८० कोटीतील २६८८०० शेअर मार्केट मेकर यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी ९९२०० शेअर राखीव ठेवण्यात आले आहेत ज्यांचे मूल्यांकन ०.७९३६ कोटी रुपये आहे ५२२५६०० शेअरपैकी ४८५७६०० शेअर लोकांसाठी विक्रीला असतील.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील एकूण गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ४६.२६% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १३.९६% वाटा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३२.६४% वाटा, मार्केट मेकरसाठी ५.१४% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. सुनिल सिंह गंगवार, सुजाता गंगवार, सत्यव्रत सिंह, देवरथ सिंह हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ९६.९६% आहे जे आयपीओनंतर ७०.५०% वर घसरणार आहे. यापूर्वीच अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने ११.६२ कोटी निधीची उभारणी केली आहे. ही कंपनी २०१३ साली स्थापन झालेली आहे. पायाभूत सुविधा (Infrastructure), सिविल, इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, पाणी इंजिनिअरिंग इत्यादीचा विविध स्वरुपात कंपनी सेवा व उत्पादन पुरवते.
कंपनीला पहिल्या तिमाहीत ९.४५ कोटींचा करोत्तर नफा (PAT) कमावला होता तर ईबीटा (EBITDA) १४.७५ कोटींवर गेला होता. कंपनीने सध्या बाजार भांडवल १५३.१८ कोटींवर आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर नव्या प्रकल्पात गुंतवणूकीसाठी, खेळत्या भांडवलासाठी, व दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी कंपनीला किती सबस्क्रिप्शन मिळाले?
पहिल्या दिवशी कंपनीला एकूण ५.२३ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून कंपनीला ५.७४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून आयपीओला ६.३६ वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून कंपनीला ३.२७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे . कंपनीच्या आयपीओतील जीएमपी किंमत सध्या २२ रूपयांनी म्हणजेच एकूण १७० रूपयांच्या आसपास सुरू आहे.
३) Anlon Healthcare Limited - अनलोन हेल्थकेअर लिमिटेड कंपनीचा आयपीओ आज २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्टपर्यंत बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल होत आहे. १२१ कोटींचा हा आयपीओ बीएसई व एनएसईत सूचीबद्ध होणार आहे. ८६ ते ९१ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित करण्यात आला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून आयपीओसाठी किमान १४१०४ रूपयांची (१६४ शेअर) गुंतवणूक करणे अनिवार्य असेल. Interactive Financial Services Limited कंपनी आयपीओसाठी बुक लि डिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे तर Kfin Technologies Ltd कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ळ १.३३ कोटी शेअर्सचा हा फ्रेश इशू आहे. त्यामुळे एकूण आयपीओतील १२१.०३ कोटीचा हा फ्रेश इशू असणार आहे. आयपीओतील पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) १ सप्टेंबरला होणार असून ३ सप्टेंबरला शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ९९७५००० वाटा, वि ना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १९९५००० (१५.००%), किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १३३०००० शेअरचा (१०%) वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल.
पुनित कुमार रसाडिया, मित अतुलकुमार वच्छानी, ममता पुनितकुमार रसाडिया हे कंपनीने प्रवर्तक आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओआधी प्रवर्तकांचे भागभांडवल ७०.२६% होते ते आयपीओनंतर घसरणार आहे. २०१३ साली या कंपनीची स्थापना झाली होती. कंपनी प्रामुख्याने केमिकल्स उत्पादनात सक्रीय आहे.फार्मा इंटरमीडिएट्स आणि सक्रिय औषध घटक (एपीआय) च्या निर्मितीमध्ये गुंतलेले आहेत.
कंपनी उच्च-शुद्धता असलेले औषध घटक (एपीआय उत्पादनासाठी) आणि सक्रिय औषध घटक (औषधे, न्यूट्रास्युटिकल्स, वैयक्तिक काळजी आणि प्राण्यांच्या आरोग्य उत्पादनांसाठी फॉर्म्युलेशनमध्ये वापरले जाणारे) तयार करते. कंपनीला इयर ऑन इयर बेसि सवर ८१% अधिक महसूल मिळाला होता. कंपनीच्या करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर ११२% वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२४ मधील ९.६६ कोटींच्या तुलनेत मार्च २०२५ मध्ये कंपनीला २०.५२ कोटींचा निधी मिळवला आहे. कंपनीच्या ईबीटा करपूर्व कमाईत मार्च २०२४ मधील १५.५७ कोटवरून मार्च २०२५ मध्ये ३२.३८ कोटींवर वाढला होता. सध्या कंपनीचे बाजार भांडवल ४८३.६८ कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर खेळ त्या भांडवलाची गरज, आधीची थकबाकी चुकवण्यासाठी, भांडवली खर्चासाठी करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी कंपनीला किती सबस्क्रिप्शन मिळाले?
पहिल्या दिवशी कंपनीला एकूण ०.६५ पटीने सबस्क्रिप्शन मिळवले आहे. त्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांकडून ५.९४ वेळा व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ० वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.३५ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे. कंपनीची सध्या जीएमपी १०५ ते १०६ रूपये दरम्यान सुरू आहे.