
मोहित सोमण: बीटकॉईनमध्ये जागतिक फटका गेल्या ७ तासात बसला आहे. जागतिक अस्थिरतेचमुळे क्रिप्टोग्राफीत गुंतवणूकदारांना मोठे नुकसान होत आहे. याच प्रभावाचा भाग म्हणून बीटकॉईनमध्ये मोठे नुकसान गुंतवणूकदारांना सहन करावे लागले. सर्वा त प्रतिष्ठीत व जूनी क्रिप्टोकरन्सी म्हणून बीटकॉईनची (Bitcoin) ओळख आहे. अशातच बीटकॉईनमध्ये गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाली आहे तर आज पहाटे ११०००० डॉलरची किमान सपोर्ट लेवलही गाठण्यास बीटकॉईनला अपयश आले. परिणामी एका च दिवसात ही क्रिप्टोकरन्सी २.६% पेक्षा अधिक पातळीवर घसरली. गेल्या आठवड्याचा विचार केल्यास करन्सी ५.७% अधिक पातळीने घसरला आहे.
तज्ञांच्या मते एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) मध्ये मोठ्या प्रमाणात क्रिप्टोग्राफी सेल ऑफ झाल्याने बाजारात बीटकॉईनसह इतर करन्सीचा भाव उतरला. तांत्रिक बाबींचा (Technicals) विचार केल्यास दैनिक चार्टवर (Daily Chart) वर घातांकीय (Exponential Moving Average EMA) आणि साधे मूव्हिंग (Simple Moving Average SMA) सरासरी वगळता प्रत्येक मूव्हिंग सरासरी खंडित झाली आहे, जी २००-दिवसांच्या ट्रेंडलाइनवर आहे. त्या झोनच्या खाली बिटकॉइनच्या किमतीत निर्णायक घट - EMA वर $ १०३,६८९ आणि SMA वर $१००,८५९ - BTC च्या किमतीसाठी आपत्ती निर्माण करू शकते आणि व्यापक तेजीला धोका निर्माण करू शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे.
जागतिक पार्श्वभूमीवर ही घसरण सुरू आहे. रशियाने ठोस पाऊल न उचलल्याने युएसने रशियावर अतिरिक्त आर्थिक बंधने घालण्याच्या धमकीचा पुनरुच्चार केल्याने बाजारातील गुंतवणूकदारांत अस्थिरता पसरली. ज्याचे नुकसान कमोडिटीसह क्रिप्टोग्राफीतही बसले आहे. आगामी अमेरिकेतील पीसीई, व जीडीपी आकडेवारीचीही गुंतवणूक प्रतिक्षा करत असल्याने व व्याजदरात कपातीवर अजूनही प्रश्न चिन्ह असल्याने मोठ्या प्रमाणात क्रिप्टोग्राफीतील मागणीत घट झाली आणि अतिरिक्त विक्रीमुळे घसरण झाली आहे.
युएसमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,रविवारी संध्याकाळी एका मोठ्या धारकाने २४००० बीटीसी (Bitcoin) खाली उतरवल्याने (विक्रीमुळे) व्हेलच्या हालचालींना काही जण दोषी ठरवतात. तर काही जण एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF) बहिर्गमन (Out flow) आणि व्यापक संस्थात्मक विक्रीमुळे (Wider Institutional Sell Off) मुळे बाजारावर परिणाम झाला आहे. या घसरणीचा फटका ऑल्टकॉइन्स आणि डेरिव्हेटिव्ह्ज बाजारपेठेत बसला आहे, फक्त २४ तासांत ८९५.२८ दशलक्ष डॉलर्सचे लिक्विडेशन झाले आहे. असे तज्ञांनी म्हटल्याचे प्रसारमाध्यमांनी यावेळी स्पष्ट केले.