Tuesday, August 26, 2025

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: 'आधीच उल्हास त्यातून फाल्गुनमास ' शेअर बाजारात मोठी घसरण फायनान्स शेअर्समध्ये मोठे नुकसान 'हे' आहे आजचे सविस्तर विश्लेषण

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: 'आधीच उल्हास त्यातून फाल्गुनमास ' शेअर बाजारात मोठी घसरण फायनान्स शेअर्समध्ये मोठे नुकसान 'हे' आहे आजचे सविस्तर विश्लेषण

मोहित सोमण:शेअर बाजारातील परिस्थिती आधीच उल्हास त्यातून फाल्गुनमास ! अशी झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील नव्या टॅरिफवाढीचा अध्यादेश निघाल्याने बाजारात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. प्रचंड मोठी घसरण शेअर बाजारात झाल्याने आ ज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर लाल रंगात झाली आहे. त्यामुळे कालचे 'बुल' मार्केट आज 'बिअर' मार्केटमध्ये बदलले आहे. अखेरच्या सत्राअखेरीस सेन्सेक्स ८४९.३७ अंकांने घसरून ८०७८६.५४ पातळीवर व निफ्टी ५० हा २५५.७० अंकाने घसरून २४ ७१२. ०५ पातळीवर स्थिरावला आहे. त्यामुळेच आज बीएसईत (१.०४%), एनएसईत (१.०२%) घसरण झाली आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स बँक निर्देशांकात ७६८.७९ व बँक निफ्टीत ६८८.८५ अंकांची भलीमोठी घसरण झाली. परिणामी फायनांशियल, व बँक समभाग कोसळल्याने बाजारातील सपोर्ट लेवलही घसरली. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे अखेर १.३४%,१.३४% घसरण झाली असून निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.६२%,२.०३% इतकी मोठी घसरण झाली आहे. विशेषतः अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) सकाळप्रमाणेच संध्याकाळीही ३.६९% उसळल्याचा फटका बाजारात बसला आहे.निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये सकाळप्रमणेच केवळ एफएमसीजी (०.९१%) निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण फायनांशियल सर्व्हिसेस एक्स बँक (२.३६%), मिड स्मॉल फायनांशियल सर्व्हिसेस (२.२३%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (२.१९%), कंज्यूमर ड्युरेबल्स (१.७७%), तेल व गॅस (१.६४%), रिअल्टी (२.२ ४%), खाजगी बँक (१.८७%) समभागात झाली आहे.

आज सकाळच्या सत्रातच गिफ्ट निफ्टीतील संकेतांमुळे पडझडीचे वारे बाजारात वाहत होते. जागतिक पातळीवरील युएसकडून टॅरिफबाबत सुरू असलेली अनिश्चितता आज नकारात्मकेत बदलली. युएस रशियात युक्रेन व रशिया युद्धातील तोडगा न निघाल्याने कच्च्या तेलाच्या व कमोडिटी बाजारासह शेअर बाजारात दबाव निर्माण झाला होता. दुसरीकडे चीनवर दुर्मीळ धातूंची निर्यात न केल्यास २००% टॅरिफची धमकी ट्रम्प यांनी दिली होती. याचवेळी ट्रम्प यांनी फेड गव्हर्नर कुक यांची हकालपट्टी केल्याने युएस फेड व्याजदरातबाबत अनिश्चितता कायम होती. सप्टेंबरमध्ये होणारी व्याजदरात कपात खरच होईल का युएस फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांच्या कपातीच्या संकेतानंतरही 'आकडेवारी व तत्कालीन आर्थिक स्थितीचा आधारे निर्णय घेतला जाईल ' अशा टिप्पणीमुळे युए स बाजारातही स्पष्टता नाही परिणामी काल युएसमधील तिन्ही बाजारात मोठी घसरण झाली असून आज सकाळपर्यंत आशियाई बाजारातही मंदीचे सावट कायम राहिले. आज युएस कस्टम व बॉर्डर प्रोटेक्शन (CBP) कडून भारताकडून आयात केलेल्या वस्तूंवर टॅरिफ लादण्याची प्रकिया सुरू झाली आहे. त्यामुळे आता अतिरिक्त २५% म्हणजे एकूण ५०% कर टॅरिफ भारतावर लादला जाणार आहे. नोटीशीत म्हटल्याप्रमाणे, अध्यक्षांची कार्यकारी ऑर्डर १४३२९ प्रमाणे ६ ऑगस्ट रोजी घोषणा 'Addresing Threats to United States by the Government of the Russian Federation 'या आश याचा मजकूर दिला आहे. २७ ऑगस्ट २०२५ पर्यंत या नोटीशीचे शेड्युलिंग (Scheduling) होणार आहे म्हणजेच ही नोटीस नियामकांना प्रदर्शित करण्यात येणार आहे. सेक्रेटरी ऑफ होमलँड सिक्युरिटी युनायटेड स्टेट्स यांनी हार्मोनाईज टॅरिफ शेड्युल ऑफ युनायटेड स्टेट्स (HTSUS) यांच्याकडून आवश्यक बदल टॅरिफमध्ये कार्यकारी आज्ञेचा (Order) भाग म्हणून करण्यात येईल' असे म्हटले आहे.

सीबीपीने दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्टला नवा दर आकारण्यात येईल. रात्री १२ वाजेपासून भारतातून युएस मध्ये येणारा उपभोग्य वस्तू (Consumption Goods) अथवा युएसमधील वेअर हाऊसमधून बाहेर पडणाऱ्या वस्तूंवर हा नवा टॅरिफ आकारण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते त्याचा फटका बाजारात बसत आहे. या अस्थिरतेच्या कालावधीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसह भारतीय गुंतवणूकदारांनी देखील सेल ऑफ अथवा नफा बुकिंग केल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना जा स्त करांमुळे भारतातील कापड, रत्ने आणि दागिने, समुद्री खाद्यपदार्थ आणि हस्तकला यासारख्या श्रम-केंद्रित निर्यात क्षेत्रांना धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले आहेत असे तज्ञांनी प्रसारमाध्यमांना नमूद केले. उदया गणेश चतुर्थी निमित्त बुधवारी बाजार बंद राहतील.

आज बीएसईतील ४२४१ समभगापैकी १२२० समभागात वाढ झाली असून २८९१ समभागात घसरण झाली आहे. आज एनएसईतील ३०८६ समभागातील (Stocks) मधील केवळ ७२७ समभाग वाढले असून तब्बल २२८० समभागात आज घसरण झाली आहे. एन एसईत तर ९० समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत. जगभरात क्रिप्टोग्राफीसह कमोडिटी बाजारातही घसरण झाली आहे. अस्थिरतेचा फटका सोन्यात बसला आहे. गुंतवणूकदारांनी आज ईपीएफ गुंतवणूकीत सावधगिरी बाळगली असल्याने मागणीत झालेल्या घसरणीमुळे दर घसरले आहेत. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.०६% घसरण झाली आहे.

आज सकाळी रशिया युएस मधील टेन्शन कायम असले तरीदेखील रशिया युक्रेन युद्धावर ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याने प्रश्न सुटेल या आशेपायी कच्च्या तेलाच्या दरात आज स्थिरता आली होती. किंबहुना काही प्रमाणात घसरण झाली. तीच परिस्थिती संध्याकाळीही आहे. स्पॉट मागणीत घसरण झाल्याने आज तेल स्वस्त झाले. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात १.७७% घसरण झाली असून Brent Future निर्देशांकात १.४७% घसरण झाली आहे. रूपयांच्या तुलनेत डॉलर निर्देशांकात अस्थिरतेमु ळे वाढ झाली परिणामी रूपया आज तब्बल २२ पैशाने घसरला आहे ज्याचाही फटका सोन्यात बसला. जागतिक सोने स्वस्त झाले असतानाही रूपयांच्या घसरणीचा परिणाम म्हणून भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात आगामी टॅरिफचा फटका बसत असल्याचे तज्ञांनी सूचित केल्यानंतर गुंतवणूकदारांनी आणखी एकदा नकारात्मक कौल बाजारात दिला. भविष्यकालीन संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेअरची विक्री झाल्याने दरपातळी घसरली. विशेषतः मिड स्मॉल कॅप सह ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही मोठी घसरण झाली. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, सिमेन्स, अदानी एंटरप्राईजेस, अपोलो हॉस्पिटल अशा हेवीवेट शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले.

आज आशियाई बाजारातील निकेयी २२५ (०.८८%), स्ट्रेट टाईम्स (०.३०%), हेंगसेंग (१.२९%), कोसपी (०.९६%), सेट कंपोझिट (०.९१%), जकार्ता कंपोझिट (०.२७%), शांघाई कंपोझिट (०.३९%) बाजारात घसरण झाली असून केवळ तैवान वेटेड (०.११%) बाजारात वाढ झाली. अमेरिकेन बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही डाऊ जोन्स (०.१०%), एस अँड पी ५०० (०.४३%), नासडाक (०.२२%) बाजारात घसरण झाली. अखेरच्या सत्रात आज सर्वाधिक वाढ रतन इंडिया (१०.१९%), ईक्लर्क सर्विसेस (५.१०%), क्राफ्ट्समन ऑटो (४.६६%), ओला इलेक्ट्रिक (४.६३%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (३.२३%), वारी एनर्जी (३.६२%), देवयानी इंटरनॅशनल (२.८५%), विशाल मेगामार्ट (२.८५%), आयशर मोटर्स (२.६८%), हिन्दुस्तान युनिलिव्हर (२.३३%), मारुती सुझुकी (१.८१%), आयटीसी (१.००%) समभागात झाली आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण वोडाफोन आयडिया (९.३२%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (५.८०%), स्वान एनर्जी (५.६९%), सीएट (५.४७%), केफिन टेक्नॉलॉजी (५.००%), वेदांता (४.९१%), बलरामपूर चिनी (५.३५%), पिरामल एंटरप्राईजेस (४.६५%), सोनाटा सॉफ्टवेअर (४.४८%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (४.५८%), श्रीराम फायनान्स (४.२१%), सनफार्मा (३.४०%), अदानी ग्रीन (३.४१%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.४०%), आयसीआयसीआय बँक (१.२७%), एचडीएफसी बँक (१.००%), इन्फोसिस (०.४१%), विप्रो (०.८०%), रिलायन्स इंडस्ट्रीज (२.०४%), टाटा मोटर्स (०.९१%) समभागात घसरण झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार विश्लेषक अजित भिडे म्हणाले आहेत की,'२५% टॅरिफ आजपासून आणखीन लागू होणार तसेच अजूनही काही नवीन स्विकृती (Sanction) येण्याची भीती बाजारात आज पहायला मि ळाली. त्यात उद्या बाजाराला सुट्टी आहे. थोड्या पोझिशन कमी करण्यात आलेली दिसतेय.शिवाय विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री सुरूच आहे.हे अमेरिकेचे टॅरिफ नाटक भारताला किती आर्थिक त्रास देत आहेत हे खुलेपणाने आता समोर येत आहे.भारताची स र्वांगीण प्रगती होत आहे ही त्याची पावतीच आहे.अमेरिकेतील अस्थिर राजकीय परिस्थिती मुळे आज अनेक कंपन्या अमेरीका सोडून जात आहेत ऑटोमोबाइल कंपन्यां प्रमुखपणे दिसत आहेत उदा.होंडा,टोयोटा,बीएम डब्लू हुवाई,सीमेंस,सॅमसंग,पेनासोनिक या अशा मोठ्या कंपन्या आपले कारखाने अमेरिकेबाहेर नेणार असल्याचे कंपन्यांनीही जाहीर केले आहे.पण सुझुकी जपान,गुगल अशा अनेक क्षेत्रातील कंपन्यां आजही नवीन गुंतवणूकीसाठी भारतात येत आहेत ही भारतासाठी खुप मोठी जमेची बाजु आहे.आज आ पला बाजार टेक्निकली थोडा नरम आहेच. आणि त्यात अमेरिकन टॅरिफचे अडथळे काही काळ रहाणार आहेत. पण भारताची ग्रोथ स्टोरी इनटॅक आहे.हेही दिवस जातील. स्टे इन्व्हेसटेड..'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'अमेरिकेच्या दंड शुल्काची अंतिम मुदत उद्या संपत असल्याने देशांतर्गत बाजारातील भावना सावध झाली आहे. भारतीय रुपयाच्या सततच्या घसरणीमुळे दबाव वाढत आहे आणि त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीवर त्याचा आणखी परिणाम होऊ शकतो. गुंतवणूकदार आर्थिक वाढीला पाठिंबा देण्यासाठी भारत सरकारच्या प्रयत्नांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, ज्याम ध्ये प्रस्तावित जीएसटी दर सुधारणा आणि उच्च शुल्कामुळे प्रभावित उद्योगांसाठी क्षेत्र-विशिष्ट मदत उपायांचा समावेश आहे. एफएमसीजी वगळता सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक विक्री दिसून आली, ज्यामुळे वापर वाढण्याची अपेक्षा वाढली.'

आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'निफ्टी २४८०० पातळीच्या आधार पातळीच्या खाली घसरला. आजची घसरण तीव्र होती, ज्यामुळे निर्देशांक ५० दिवसांच्या महत्त्वाच्या ईएमए (Exponential Moving Average EMA) च्या खाली आला. आरएसआय (Relative Strength Index RSI) ने मंदीच्या क्रॉसओवरमध्ये प्रवेश केला आहे, जो कमकुवत किंमत गती दर्शवितो. अल्पावधीत, निर्देशांक २४८५० पातळीच्या खाली व्यवहार करत असताना विक्रीच्या दबावाखाली राहण्याची शक्यता आहे. नकारात्मक बाजूने, सुधारणा २४१५० किंवा त्याहून कमी पर्यंत वाढू शकते.'

आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सोन्याच्या किमतींमध्ये रेंज-बाउंड पण अस्थिर सत्र दिसून आले, कॉमेक्सवर $6 आणि एमसीएक्सवर २०० ने वाढ झाली आणि अनुक्रमे $३३७२ आणि १००८५० पातळीच्या जवळ स्थिरावल्या. बाजाराचे लक्ष आता पुढील आठवड्यातील यूएस बेरोजगारी डेटा आणि बिगर-शेती वेतनांवर केंद्रित आहे, जे सप्टेंबरमध्ये फेड दर कपातीच्या अपेक्षेसह सोन्याला आधार देण्याची शक्यता आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन संघर्ष आणि चालू शांतता चर्चेभोवती भू-राजकीय तणाव अस्थिरता वाढवत आहेत. एकूणच, सोन्याने ९९०००–१०२००० पातळीच्या अपेक्षित ट्रेडिंग रेंजसह सकारात्मक पक्षपात कायम ठेवला आहे.'

आजच्या बाजारातील रूपयांच्या स्थितीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'अमेरिकेने अतिरिक्त २५% कर लादल्यानंतर नवीन दबाव निर्माण झाल्याने रुपयाची कमजोरी वाढली आणि तो ८७.७५ च्या जवळ आला. यामुळे भारतीय वस्तूंवर एकूण कर सुमारे ५०% पर्यंत वाढला. या निर्णयामुळे भारताच्या निर्यातीच्या दृष्टिकोनावर परिणाम होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे चलनात कोणतीही सतत सुधारणा मर्यादित होईल. गेल्या सत्रात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे १.५% ने कमी झाल्या आहेत, ज्यामुळे आयात बिलाच्या बाजूने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, परंतु टॅरिफच्या नकारात्मक परिणामामुळे या नफ्यावर पडदा पडला आहे. FII आउटफ्लो आणि एकूण डॉलरच्या मागणीने वाढीवर आणखी मर्यादा आणल्या आहेत. रुपयाची व्यापार श्रेणी आता ८७.२५ आणि ८८.२५ च्या दरम्यान दिसून येत आहे, जोपर्यंत भावना सुधारत नाही तोपर्यंत घसरणीकडे झुकण्याचा धोका आहे.'

तथापि बाजाराला आवश्यक असलेली फेज आल्याने गुंतवणूकदारांनी आपला संयम बाळगल्यास त्याचा फायदा भविष्यात होईल. आज तात्पुरती कंसोलिडेशनची फेज आली असली तरी मजबूत फंडामेंटल आधारे बाजारात वाढ होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात गुंतवणूकदारांना सावधगिरीचा सल्ला मिळत आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींकडे लक्ष केंद्रित केल्यास त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >