
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत एक नवं घर बांधत आहेत, ज्याची किंमत सुमारे २५० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. अलीकडेच या अंडर कन्स्ट्रक्शन घराचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते, जे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. आता आलिया भट्ट परवानगी न घेता त्यांच्या घराचे व्हिडिओ शूट करणाऱ्यांवर ती चांगलीच संतापली आहेत.
आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत, तिच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ तयार करणाऱ्यांना खरं-खोटं सुनावलं आहे. तिने याला “प्रायव्हसीचा उल्लंघन” आणि “सिरीयस सिक्युरिटी इश्यू” असे म्हटले आहे.ती म्हणाली “मला समजतं की मुंबईसारख्या शहरात जागा मर्यादित असते. कधी-कधी तुमच्या खिडकीतून दुसऱ्यांच्या घराचा देखावा दिसतो. पण याचा अर्थ असा नाही की कुणालाही एखाद्याच्या खाजगी घराचे व्हिडिओ तयार करून ते ऑनलाइन शेअर करण्याचा अधिकार आहे. आमच्या नव्या, बांधकाम सुरू असलेल्या घराचा व्हिडिओ आमच्या परवानगीशिवाय, आमच्या माहितीशिवाय काही पब्लिकेशन्सनी शूट केला आणि तो शेअरही केला. हे सरळ सरळ प्रायव्हसीचा भंग आहे आणि गंभीर सुरक्षा धोका आहे.”
View this post on Instagram
आलिया पुढे म्हणाली, “परवानगी न घेता कुणाचंही पर्सनल स्पेस शूट करणं हे कंटेंट नाही, हे उल्लंघन आहे. आणि हे कधीही सामान्य मानू नये. विचार करा, जर तुमच्या घराचे व्हिडिओ कोणी तुमच्या माहितीशिवाय पब्लिकली शेअर केले, तर तुम्हाला चालेल का? आपल्यापैकी कुणालाही हे मान्य नसेल.”
पोस्टच्या शेवटी आलियाने एक विनंती केली कि, “जर तुम्हाला असं कोणतंही कंटेंट ऑनलाइन सापडलं, तर कृपया ते फॉरवर्ड किंवा शेअर करू नका. आणि जे माध्यमं/पब्लिकेशन्स यांनी हे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत, त्यांना मी विनंती करते की हे लगेच डिलिट करा. धन्यवाद.”