Monday, August 25, 2025

आज एचडीएफसी बँकेचा बोनस शेअर कमावण्यासाठी अंतिम मुदत 'ही' आहे रेकॉर्ड डेट !

आज एचडीएफसी बँकेचा बोनस शेअर कमावण्यासाठी अंतिम मुदत 'ही' आहे रेकॉर्ड डेट !

मोहित सोमण: एचडीएफसी बँकेचा बोनस शेअर कमाईसाठी आज अखेरची संधी असणार आहे. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखली जाणारी एचडीएफसी बँकेने २६ ऑगस्टला आपली रेकॉर्ड तारीख (Record Date) घोषित केली होती. त्यामुळे आज एचडीएफसी (HDFC) बँकेचा शेअर खरेदी करणारेच आगामी बोनस शेअरसाठी पात्र असणार आहेत. उद्याच्या नोंदणी तारखेला अटी व शर्तीला पात्र असणारे. भागभांडवलदार लाभास पात्र ठरतील. याआधी बँकेने १:१ बोनस शेअर जाहीर केला होता.

१:१ बोनस गुणोत्तर (Ratio)अंतर्गत, भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक शेअरसाठी एक अतिरिक्त शेअर मिळेल, ज्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीच्या एकूण मूल्यावर परिणाम न होता त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सची संख्या दुप्पट झाल्याने बँकेच्या भागभांडवल धारकांच्या मूल्यांकनात दुपटीने वाढ होणार आहे. बाजारातील सहभागी अनेकदा बोनस इश्यू हे व्यवस्थापनाकडून मिळालेल्या विश्वासाचे लक्षण मानतात, जे मजबूत आर्थिक आरोग्य राखून शेअरहोल्डर्सना बक्षीस देण्याची बँकेची क्षमता प्रतिबिंबित करत आहे.

आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत बँकेने चांगली आर्थिक कामगिरी केली होती. त्यामुळे चांगल्या नफ्याच्या पार्श्वभूमीवर ही बोनसची घोषणा करण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेने इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १२% वाढ (Growth)नोंदवली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच तिमाही कालावधीतील १६१७५ कोटी रुपयांच्या तुलनेत १८१५५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

निकालातील माहितीनुसार, या तिमाहीत बँकेच्या व्याज उत्पन्न (Interest Income) वाढून ७७४७० कोटी रुपये झाले, जे आर्थिक वर्ष २५ च्या त्याच तिमाहीत नोंदवलेल्या ७३०३३ कोटी रुपयांच्या तुलनेत ६% वाढले आहे. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) देखील वार्षिक आधारावर ५.४% वाढून ३१,४४० कोटी रुपये झाले आहे, जे आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत २९८४० कोटी रुपये होते.

दरम्यान, एकूण मालमत्तेवर कोअर नेट इंटरेस्ट मार्जिन (NIM) ३.३५% होता, जो मार्च २०२५ मध्ये संपलेल्या मागील तिमाहीत नोंदवलेल्या ३.४६% पेक्षा किंचित कमी आहे.मालमत्तेच्या पुनर्मूल्यांकनामुळे ही घट झाली असे बँकेने मार्जिनबाबत बोलताना म्हटले होते.

Comments
Add Comment