Monday, August 25, 2025

सकाळच्या सत्रात शेअर बाजार दमदार ! आयटी, बँक, मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये रॅली सेन्सेक्स २६८.९७ व निफ्टी ७७.६४ अंकांने उसळला 'हे' आहे सकाळचे विश्लेषण!

सकाळच्या सत्रात शेअर बाजार दमदार ! आयटी, बँक, मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये रॅली सेन्सेक्स २६८.९७ व निफ्टी ७७.६४ अंकांने उसळला 'हे' आहे सकाळचे विश्लेषण!

मोहित सोमण: आज सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. सकाळी गिफ्ट निफ्टीत वाढ झाल्यानंतर शेअर बाजारातील वाढीची चाहूल लागली होती. अखेरीस सत्राच्या सुरुवातीलाच बाजारात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिणाम शेअर बाजारात परावर्तित होत असल्याचे यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवत आहे. सत्राच्या सुरुवातीच्या कलात सेन्सेक्स २६८.९७ अंकाने व निफ्टी ७७.६४ अंकाने वाढला आहे. सुरवातीला सेन्सेक्स बँक निर्देशांकात ११५.०१ अंकांने व बँक निफ्टीत ११०.०० अंकाने वाढ झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२५%,०.१७% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१७%,०.०७% वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) मध्ये सकाळच्या सत्रातील कलात संमिश्र प्रतिसाद आहे. सर्वाधिक वाढ आयटी (२.०९%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.३५%), मेटल (०.९३%), रिअल्टी (०.५०%) निर्देशांकात वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण मिडिया (१.३८%), एफएमसीजी (०.३०%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.२२%) निर्देशांकात झाली आहे.

आज युएस बाजारातील, आशियाई बाजारातील व गिफ्ट निफ्टीतील वाढीमुळे भारतीय शेअर बाजारातही वाढ अपेक्षित होती. त्याप्रमाणेच गुंतवणूकदारांनी सुरूवातीच्या सत्रात सकारात्मक कल दिला आहे. शुक्रवारी सेल ऑफ प्रेशर मुळे गुंतवणूकदारांनी क्षेत्रीय विशेष समभागात विशेषतः आयटी, फायनांशियल सर्व्हिसेस, एक्स बँक, फार्मा शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे निर्देशांक खालावला होता. याशिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात काढून घेतली होती. २२ तारखेच्या प्रोविजनल डेटातील माहितीनुसार घरगुती गुंतवणूकदारांनी (DII) ३२९ कोटीची रोख गुंतवणूक बाजारातून काढून टाकली होती तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) तर १६२३ कोटींची गुंतवणूक बाजारातून काढल्याने बाजारातील निर्देशांक लाल रंगात बंद झाला होता. शुक्रवारी युएस बाजारात मोठी रॅली झाली होती. डाऊ जोन्स (१.२९%), एस अँड पी ५०० (१.५२%), नासडाक (१.८८%)वाढले होते. आशियाई बाजारानींही मोठा प्रतिसाद दिल्याने आशियातील काही बाजारात मोठी वाढ झाली होती. ज्यामध्ये निकेयी (१.०८%), कोसपी (०.७५%) यांचा समावेश होता. २२ तारखेला युरोपियन बाजारातही सीएससी (०.३९%), डीएएक्स (०.२९%), एफटीएसई (०.१३%) या तिन्ही बाजारात वाढ झाली होती.

युएस बाजारातील फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांच्या अभिभाषणात त्यांनी फेड व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिल्याने अमेरिकेतील शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पसरले होते ज्याचा मोठा फायदा अमेरिकेतील आयटी तंत्रज्ञान शेअर्समध्ये पडला होता. आज सकाळच्या सत्रात आशियाई बाजारातील आजच्या सुरुवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.३९%) सह निकेयी २२५ (०.३२%), स्ट्रेट टाईम्स (०.१५%), हेंगसेंग (२.०३%), सेट कंपोझिट (०.८६%), जकार्ता कंपोझिट (१.०४%), शांघाई कंपोझिट (०.८६%) या सगळ्याच बाजारात आज वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात डॉलर निर्देशांकात (Dollar Index DXY) मध्ये ०.१५% वाढ झाल्याने आजही रूपयात घसरणीची शक्यता आहे. सोन्याच्या बाबतीत विचार केल्यास सकाळच्या सत्रात गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.२६% घसरण झाली आहे ज्यामुळे भारतीय सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली. युएस बाजारातील अतिरिक्त टॅरिफचा दबाव वाढल्याने आज कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात दबाव झाल्याने कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. ज्यामध्ये WTI Futures ०.२२%, Brent Future निर्देशांकात ०.१६% वाढ झाली आहे.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत असून येणाऱ्या काळात भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाईल या वक्तव्याचा पुनरुच्चार केला होता. रशिया व भारत यांच्यातील तेलाच्या करारानंतरही भारताच्या कमोडिटी बाजारातील दबाव कमी झाला होता. ज्याचाही फायदा आज बाजारात होऊ शकतो. दुसरीकडे मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये झालेल्या वाढीमुळे बाजारात एकूणच वाढ झाली असली तरी मात्र सकाळच्या सत्रात भारतीय अस्थिरता निर्देशांक (Indian Volatility Index VIX) मध्ये ३.६०% वाढ झाली आहे. ज्यामुळे अजूनही अखेरच्या सत्रातील शेवटच्या टप्प्यापर्यंत अस्थिरतेचा धोका कायम राहू शकतो. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम आजही अपेक्षित असला तरी दुसरीकडे जीएसटी कपातीच्या घोषणेनंतर आज निफ्टी क्षेत्रीय समभागातील व्यक्तिगत कामगिरीही बाजारात नवे वळण देईल.

सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलात सर्वाधिक वाढ न्यूजेन सॉफ्टवेअर (६.३८%), जिंदाल स्टेन (४.४०%), इ क्लर्क सर्विसेस (४.३८%), सोनाटा सॉफ्टवेअर (३.७६%), एमफसीस (३.४९%), लेटंट व्ह्यू (३.४९%), झेंसर टेक्नॉलॉजी (३.२६%), किर्लोस्कर ब्रदर्स (३.१३%), विप्रो (२.६४%), इन्फोऐज इंडिया (२.३५%), इन्फोसिस (२.५२%), आरबीएल बँक (२.११%), टीसीएस (२.०६%),येस बँक (२.०२%) या समभागात झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण सुंदरम फायनान्स (२.७६%), इंडिया सिमेंट (२.६०%), वारी एनर्जी (२.५७%), झी एंटरटेनमेंट (१.७३%), हिताची एनर्जी (१.५८%), सीसीएल प्रोडक्ट (१.४८%), नेटवर्क १८ (१.२३%), रेमंड लाईफस्टाईल (१.४२%), पीबी फिनटेक (१.३२%), एजंल वन (१.१४%), स्विगी (१.२२%), बीएसई (१.००%), जेल इंडिया (०.८४%), सुझलोन एनर्जी (०.८२%), भारती एअरटेल (०.७८%), टोरंट पॉवर (०.६९%) समभागात झाली आहे.

सकाळच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक अमृता शिंदे म्हणाल्या आहेत की,'भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे, गिफ्ट निफ्टी निफ्टी ५० मध्ये सुमारे १०० अंकांनी वाढ दर्शवित आहे. बाजारातील भावना सावधपणे आशावादी राहिल्या आहेत, जरी सततची अस्थिरता आणि मिश्रित जागतिक संकेत गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम करत आहेत.शुक्रवारी, भारतीय शेअर बाजारांनी आठवड्याचा शेवट दबावाखाली केला कारण सतत विक्रीमुळे मागील चार सत्रांमधील वाढ नष्ट झाली. तांत्रिकदृष्ट्या, निफ्टी २४८४० पातळीवर त्याच्या अल्पकालीन समर्थनाजवळ आहे, जो ५०-दिवसांच्या ईएमए (Exponential Moving Average EMA) शी जुळतो. या पातळीपेक्षा कमी ब्रेकडाउन निर्देशांक २४६५० पर्यंत आणि पुढे २४५०० पातळीच्या विस्तृत समर्थनाजवळ खेचू शकतो. वरच्या बाजूला, २५१५०-२५३५० झोनमध्ये प्रतिकार दिसून येतो आणि या श्रेणीच्या वर निर्णायक बंद झाल्यास नवीन तेजी येऊ शकते.

बँक निफ्टी देखील खाली बंद झाला, ५६०००-५६१६० झोनमध्ये नकाराचा सामना केल्यानंतर ५५१४९ पातळीच्या जवळ बंद झाला, ज्यामुळे मजबूत विक्री दिसून आली. दबाव. निर्देशांकाने त्याची अलीकडील श्रेणी तोडली, घसरणीची पोकळी भरून काढली आ णि आठवड्यातील ८०० हून अधिक वाढीचे अंक पुसून टाकले. ५५५०० पातळीच्या प्रमुख आधाराच्या खाली एक मजबूत मंदीचा मेणबत्ती बंद झाला, ज्यामुळे घसरणीची गती वाढली.जर निर्देशांक ५५००० पातळीच्या खाली घसरला, तर ५४९०० (२० आठवड्यांचा EMA) आणि ५४४५० पातळीकडे आणखी कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरच्या बाजूस, तात्काळ प्रतिकार ५५५०० पातळीवर आहे, जर सतत खरेदी झाली तर ५५७५० आणि ५६००० पातळीवर आणखी लक्ष्य असेल.प्रवाहाच्या आघाडीवर, प रदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) २२ ऑगस्ट रोजी १६२२ कोटी किमतीचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ३२९ कोटी किमतीचे शेअर्स विकले.

वाढत्या अस्थिरतेची आणि मिश्रित जागतिक सिग्नलच्या पार्श्वभूमीवर, सावधगिरी बाळगून "बाय-ऑन-डिप्स" धोरणाचा सल्ला दिला जातो. जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी व्यापारी रॅलीवर आंशिक नफा बुक करण्याचा आणि कडक ट्रेलिंग स्टॉप-लॉस राखण्याचा विचार करू शकतात. जर निफ्टी २५२५० पातळीच्या वर टिकला तरच नवीन लॉन्ग पोझिशन्स सुरू कराव्यात. व्यापक ट्रेंड सावधगिरीने तेजीत असला तरी, येणाऱ्या सत्रांमध्ये प्रमुख तांत्रिक पातळी आणि जागतिक संकेतांचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक असेल.'

आजच्या सकाळच्या निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'शुक्रवारी २४८५० पातळीवर न जाता अपेक्षित अस्थिरता दिसून आली, त्यामुळे आज आपण वर जाण्याचे पुन्हा प्रयत्न करू अशी अपेक्षा आहे. तथापि, सुरुवातीच्या सकारात्मकतेनंतर २५११५ पातळीवर तरंगण्यास असमर्थता किंवा २४७४० पातळीच्या खाली थेट घसरण झाल्यास २३८६० पातळीवर घसरण होऊ शकते. तथापि, आज हे अपेक्षित नाही. तथापि, मुक्त वर जाण्याची अपेक्षा देखील कमी आहे.'

सकाळच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'फेडचे प्रमुख पॉवेल यांनी जॅक्सन होल येथे केलेल्या वक्तव्यावरून सप्टेंबरमध्ये दर कपातीचे संकेत मिळतात, 'बेरोजगारीचा धोका कमी होऊ शकतो आणि जोखीम संतुलन बदलल्याने धोरणात्मक समायोजनाची आवश्यकता असू शकते' हे स्पष्ट होते. या टिप्पणीला अमेरिकन शेअर बाजाराने चांगला प्रतिसाद दिला. भारतीय बाजारपेठेत या सकारात्मक घटकाचे प्रतिबिंब पडण्याची शक्यता नाही कारण टॅरिफच्या चिंता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आता, रशिया-युक्रेन युद्ध सुरू असल्याने, रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारतावर २५% दंडात्मक शुल्क २७ ऑगस्टपासून लागू होण्याची शक्यता आहे. जरी ५०% टॅरिफचा भारताच्या विकासावर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता नसली तरी, भारताच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होईल आणि कापड, रत्ने आणि दागिने आणि चामडे यासारख्या कामगार-केंद्रित क्षेत्रांमध्ये नोकऱ्या कमी होतील. या विकासाचा भावनिक परिणाम बाजाराच्या दृष्टिकोनातून नकारात्मक असेल. एफआयआय विक्रीचाही बाजारावर परिणाम होऊ शकतो. देशांतर्गत वापराचे क्षेत्र जसे की वित्तीय, दूरसंचार, विमान वाहतूक, हॉटेल्स, सिमेंट आणि भांडवली वस्तूंचे विभाग प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत आहेत.'

त्यामुळे आज शेअर बाजारात वाढच अपेक्षित असली तरी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. विशेषतः निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील कामगिरी आज बाजाराची दिशा ठरवू शकणार असली तरी परदेशी गुंतवणूकदारांची पोझिशनही घरगुती गुंतवणूकदारांसाठी नवी रणनीती ठरवण्यासाठी मदत करेल. दरम्यान गुंतवणूकदारांनी जागतिक स्तरावरील घडामोडीवरही ठेवणे गरजेचे आहे. बाजारातील अखेरच्या सत्रातील निर्देशांकाची कामगिरी आज आयटी, बँक, फायनांशियल शेअर्स देखील ठरवण्यास मदतगार ठरतील अशी शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >