Square Yards चा आर्थिक तिमाही निकाल जाहीर! कंपनीच्या महसूलात ४५% वाढ तर ईबीटा ११३% वाढला

  23

मोहित सोमण:देशातील मोठा रिअल इस्टेट क्षेत्रातील ऑनलाईन व्यासपीठ (Platform) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्क्वेअर यार्ड (Square Yards) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला पहिल्या तिमाहीत (Q1FY26) ३७८ कोटींचा महसूल (Revenue) मिळाला आहे. तर कंपनीचा तिमाहीतील ईबीटा (करपूर्व कमाई EBITDA) ४.४ कोटींवर गेला असून स्थूल नफा (Gross Profit) ७० कोटींवर गेला आहे. कंपनीने जाहीर केलेल्या निकालातील माहितीनुसार, कंपनीच्या पहिल्या तिमाहीतील महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४५% वाढत ३७८ कोटीवर पोहोचला. मागील वर्षाच्या तिमाहीत महसूल २६० कोटीवर होता. स्थूल नफा मागील वर्षाच्या तिमाहीतील २४ कोटीवरून वाढत ७० कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या करपूर्व कमाईत EBITDA मध्ये मागील वर्षाच्या तिमाहीत ३३.७ कोटीचा तोटा झाला होता जो या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर ४.४ कोटींची वाढीव कमाई झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या ईबीटात इयर ऑन इयर बेसिसवर ११३% वाढ मिळाली आहे. कंपनीच्या ईबीटा मार्जिनमध्ये मागील -१३% तुलनेत या तिमाहीत १% वाढल्याने ते १४१३ बीपीएस (BPS) ने वाढले असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.


कंपनीने ५५७७१ हून अधिक व्यवहार (Transactions) केले आणि आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत १८४८० कोटी रुपयांचे ग्रॉस ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू (GTV) गाठले. आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत व्यवसायात ऑपरेशनल लीव्हरेजची क्षमता दिसून आली, एकूण नफा मार्जिन (Net Margin) १८% पर्यंत पोहोचले आहे.आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत, एकूण नफा १९२% ने वाढला, एकूण नफा मार्जिन ९०० बेसिस पॉइंट्सपेक्षा जास्त सुधारून १८% वर पोहोचला. तिमाहीत एकूण EBITDA मार्जिन सकारात्मक झाला, तर विभागीय EBITDA मार्जिन १०% वर राहिला. नफा मेट्रिक्समधील सुधारणा प्रामुख्याने उच्च स्केल आणि उत्पादकतेतील वाढीमुळे झाली, जी गेल्या अनेक तिमाहींमध्ये अंमलात आणलेल्या कार्यक्षमता उपायांना प्रतिबिंबित करते.


कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,'वित्तीय सेवांमध्ये मजबूत कामगिरीमुळे जीटीवी (Gross Transaction Value GTV) इयर ऑन इयर बेसिसवर ८४% ने वाढला. या कालावधीत नवीन ऑर्डर सुमारे ४७% ने वाढल्या. डिजिटल उत्पादने वगळता सर्व व्यवसाय विभागांमध्ये महसूल वाढला. रिअल इस्टेट महसूल वर्षानुवर्षे ३६% वाढला, वित्तीय सेवांमध्ये ६०% वाढ झाली आणि घरांच्या नूतनीकरणात २१% वाढ झाली आहे.'


तिमाही निकालावर भाष्य करताना स्क्वेअर यार्ड लिमिटेडचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी तनुज शोरी म्हणाले आहेत की,' पहिल्या तिमाहीतील आमची सर्वात मजबूत कामगिरी करताना आम्हाला आनंद होत आहे, जो स्क्वेअर यार्ड्ससाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे. दरवर्षी महसूल ४५% ने वाढला आहे आणि एकूण नफा जवळजवळ तिप्पट झाला आहे, या तिमाहीत आमच्या ऑपरेटिंग मॉडेलची ताकद दिसून येते. पारंपारिकपणे आमचा सर्वात कमकुवत हंगाम असलेल्या पहिल्या तिमाहीत नफा मिळवणे, आमच्या बहु-उभ्या (Multivertical) व्यवसायाची लवचिकता (Flexibility( आणि मजबूत युनिट अर्थशास्त्र (Stronger Unit Economics) अधोरेखित करते. पहिल्या तिमाहीत ऐतिहासिकदृष्ट्या वर्षाचा फक्त एक छोटासा वाटा असल्याने, ही मजबूत सुरुवात शाश्वत वाढ आणि नफा मिळवून आमची महत्त्वाकांक्षी आर्थिक वर्ष २६ उद्दिष्टे साध्य करण्याचा आमचा आत्मविश्वास वाढवते.'


स्क्वेअर यार्ड्स हे भारतातील मोठे एकात्मिक रिअल इस्टेट मार्केटप्लेसपैकी एक आहे. ९ देशांमधील १००+ शहरांमध्ये कंपनीची उपस्थिती आहे. उपलब्ध माहितीनुसार,स्क्वेअर यार्ड्स नऊ देशांमधील १०० हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे आणि त्याचे १५०००० एजंट भागीदार आहेत. मागील आर्थिक वर्षात, स्क्वेअर यार्ड्सने त्यांच्या ऑपरेटिंग महसुलात वार्षिक आधारावर ४०.९% वाढ नोंदवली आणि १४१० कोटी रुपये केले, तर आर्थिक वर्ष २०२५ मध्ये त्यांचा एकूण नफा ५१.९% वाढून ३१६ कोटी रुपये झाला, जो आर्थिक वर्ष २४ मध्ये २०८ कोटी रुपये होता. यापूर्वी जुलै महिन्यात कंपनी २००० कोटींचा आयपीओ आणू शकते अशी माहिती सुत्रांनी दिल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी दिली होती. उभारलेल्या निधीचा एक महत्त्वाचा भाग सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना बाहेर पडण्याची संधी देण्यासाठी आणि कंपनीचे कर्ज कमी करण्यासाठी वापरला जाईल असेही सूत्रांनी यावेळी नमूद केले होते. आगामी वर्षात कंपनी आयपीओसाठी बेबीकडे डीएआरपी सादर करू शकते असा अंदाज आहे.२०१३ मध्ये स्थापित, स्क्वेअर यार्ड्स हे एक प्रोपटेक प्लॅटफॉर्म आहे जे मालमत्ता शोध, खरेदी आणि विक्री, गृहकर्ज मदत, गृह फर्निशिंग, भाडे आणि मालमत्ता व्यवस्थापन यासह एंड-टू-एंड (End to End) रिअल इस्टेट सेवा प्रदान करते.

Comments
Add Comment

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

बँक ऑफ इंडियाकडून आता अनिल अंबानी 'Fraud' घोषित आरकॉमकडून आरोपांचे खंडन म्हणाले,'हे प्रकरण..

प्रतिनिधी:उद्योगपती अनिल अंबानी यांना आणखी एक धक्का बसला आहे. विघ्नाचे शुक्लकाष्ट संपत नाही तोपर्यंत आता

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव आणि मोदकांची गोड परंपरा! बाप्पासाठी १० दिवस १० प्रकारचे हटके मोदक बनवा, ही सोपी रेसिपी पहा

गणेश चतुर्थी म्हटली की महाराष्ट्रात उत्साह, भक्ती आणि आनंदाचा सोहळा सुरू होतो. हा केवळ धार्मिक सण नसून, प्रत्येक

महाराष्ट्रीय भाऊ'ची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री, सलमान खानने केली खास मराठमोळा 'पाहुणचार'

मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन, ज्याला 'महाराष्ट्रीय भाऊ' म्हणून ओळखले जाते, त्या प्रणित मोरेने 'बिग बॉस 19'च्या

Health: मुलांची उंची आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ

मुंबई : मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांची उंची