
पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात २७ ते ६ तारखेपर्यंत दारूबंदी असणार आहे. तर गणपती आगमन आणि विसर्जन दिवशी पुणे जिल्ह्यात पूर्ण दारू बंदी असेल 5 व्या आणि 7 व्या दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावरदेखील दुकान बंद राहणार आहेत.
२७ ते ६ तारखेपर्यंत खडक, विश्रामबाग फारसखाना या पोलीस स्टेशन हद्दीतील दारू विक्री राहणार बंद, गणपती आगमन आणि विसर्जन दिवशी पुणे जिल्ह्यात पूर्ण दारू बंदी असणार, ५ आणि ७ दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर दुकान बंद राहणार आहेत.
गणेशोत्सवाला 2 दिवस शिल्लक आहेत. संपूर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. या दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणादेखील सज्ज आहे. दरम्यान गणेशोत्सव काळासाठी पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय.