Monday, August 25, 2025

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सेन्सेक्स व निफ्टीत वाढ शेअर बाजाराची गाडी पुन्हा रुळावर 'या' कारणामुळे वाढ जाणून घ्या आजचे विश्लेषण

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सेन्सेक्स व निफ्टीत वाढ शेअर बाजाराची गाडी पुन्हा रुळावर 'या' कारणामुळे वाढ जाणून घ्या आजचे विश्लेषण

मोहित सोमण : आज अखेरचा सत्राच्या अखेरीस इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ३२९.०६ अंकाने वाढत ८१६३५.९१ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ५० हा ९७.६५ अंकाने वाढत २४९६७.७५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक १९.७८ वाढला असून बँक निफ्टी मात्र १०.१० अंकाने घसरला आहे. सेन्सेक्स मिडकॅप ०.१०% वाढ झाली असून स्मॉलकॅपमध्ये ०.०२% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप ०.१२% वाढ झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये ०.०४% घसरण झाली आहे. सकाळ च्या सत्रातील ३% हून अधिक पातळीवर उसळलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Index) ०.२५% वर स्थिरावला आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात ( Nifty Sectoral Indices) मध्ये अखेरच्या सत्राअखेरीस संमिश्र प्रतिसाद कायम राहिला. सर्वाधिक वाढ आयटी (२. ३७%), रिअल्टी (०.७५%),मेटल (०.६५%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.११%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.५७%) निर्देशांकात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण मिडिया (१.६७%), मिड स्मॉल हेल्थकेअर (०.५५%), मिडस्मॉल फायनांशियल सर्व्हिसेस (०.३२%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.४४%) निर्देशांकात झाली.

आज अखेरचा सत्रात सकाळची रॅली कायम राहण्यात लार्जकॅप, व मिडकॅपमध्ये झालेल्या वाढीचा हातभार लागला आहे. याखेरीज शुक्रवारी युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात सप्टेंबरमध्ये कपात होऊ शकते अशी शक्यता निर्माण झाल्याने बाजारातील सकारात्मकता आजही कायम होती. सकाळी गिफ्ट निफ्टीतील वाढीसह ही रॅली आज सुरूवातीच्या सत्रातच परावर्तित झाली. ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपसह विशेषतः आयटी, टेलिकॉम, रिअल्टी, कंज्यूमर ड्युरेबल्स यांसारख्या समभागात वाढ झाल्याने बाजारात वाढ झाली आहे. मात्र आज स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण झाली ज्यामुळे बाजारातील सपोर्ट लेवल राखली गेली असली तरी मोठी रॅली रोखली गेली आहे. सकाळपासूनच टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टेक महिंद्रा यांसारख्या हेवीवेट शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजाराला आधारभूत पातळी गाठता आल्याने शेअर बाजार 'हिरव्या' रंगात बंद झाला आहे. दुसरीकडे अदानी एंटरप्राईजेस, अपोलो हॉस्पिटल, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडि या यासारखे बडे शेअर कोसळल्याने आज शेअर बाजार वाढीची पातळी पातळीपेक्षा अधिक वाढली नाही. जेरोमी पॉवेल यांच्या भाषणानंतर शुक्रवारी युएस बाजारात मोठी वाढ झाली होती. तेव्हापासून युएस बाजारातील आयटी शेअर्समध्ये मोठी रॅली झाली होती तोच ट्रेड भारतासह आशियाई बाजारात कायम राहिला. व्याजदरात कपातीचे संकेत जेरोमी पॉवेल यांनी दिल्याने तज्ञ युएस बाजारात व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात होईल अशी शक्यता वर्तवत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जीएसटीच्या क पातीची घोषणा केल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळाली असून बाजारातील तरलता (Liquidity) वाढू शकते ज्याचा फायदा गुंतवणूकीत दिसून येऊ शकतो.

आजच्या ट्रेडिंग सत्रात पेपर स्टॉक्स प्रसिद्धीच्या झोतात होते. या क्षेत्रातील काही उत्साही स्टॉक्समध्ये तामिळनाडू न्यूजप्रिंट अँड पेपर्स, जेके पेपर लिमिटेड, वेस्ट कोस्ट पेपर आणि आंध्र पेपर या शेअर्समध्ये मोठी रॅली झाली असून इतर पेपर स्टॉक्समध्येही आज ते जी दिसून आली आहे. केंद्र सरकारने व्हर्जिन मल्टी-लेयर पेपर बोर्ड (VPB) साठी किमान आयात किंमत (MIP) लागू केल्यानंतर कागदाचा साठा वाढत आहे.औषधनिर्माण, एफएमसीजी, इलेक्ट्रॉनिक्स, सौंदर्यप्रसाधने, मद्य आणि प्रकाशन क्षेत्रातील उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये व्हीपीबीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे 'मोराल' वाढल्याने गुंतवणूकदारांचा फायदा झाला आहे. एकीकडे शेअर बाजारात वाढ झाली असली तरी घसरणीचा अंडरकरंट कायम होता. बीएसई तील एकूण ४३८६ समभागातील (Stocks) मधील १९४७ समभागात वाढ झाली असून २२४० समभागात मात्र नुकसान झाले आहे. एनएसईतील ३१११ समभगापैकी १४१४ समभागात वाढ झाली असून १६१५ समभागात घसरण झाली आहे. विशेष म्हणजे बीएसईत आज २८९ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले असून २०७ समभागही लोअर सर्किटवर राहिले आहेत. एनएसईत ११४ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले असून ८५ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत. दुसरीकडे युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.२०%) बाजारात घसरण झाली असून एस अँड पी ५०० (१.५२%), नासडाक (१.८८%) बाजारात घसरण झाली आहे. आशियाई बाजारात अखेरच्या सत्रात गिफ्ट निफ्टी (०.४६%) सह निकेयी २२५ (०.४१%), स्ट्रेट टाईम्स (०.०८%), हेंगसेंग (१.७७%), तैवान वेटेड (२.११%), कोसपी (१.२८%), सेट कंपोझिट (०.७३%), जकार्ता कंपोझिट (०.८६%), शांघाई कंपोझिट (१.४९%) या सगळ्याच बाजारात आज वाढ झाली आहे.

आज जागतिक सोन्याच्या निर्देशांकात सकाळपासूनच घसरण सुरू होती ती संध्याकाळपर्यंत कायम राहिली आहे. युएसकडून अतिरिक्त टॅरिफच्या धर्तीवर कमोडिटी बाजार अस्थिर आहे. दुसरीकडे युएस फेडरल बँकेचे गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांच्या दरकपाती वरील वक्तव्यानंतर सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली आहे ज्याला डॉलरच्या घसरणीचा आधार मिळाला ज्यामुळे सोने स्वस्त झाले. डॉलरच्या तुलनेत आज रूपयात १७ पैसे वाढ झाल्याने भारतीय बाजारात सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली. याशिवाय आगा मी युएस बाजारातील जीडीपी व व्यक्तिगत उपभोग (Personal Consumption Expenditure) आकडेवारीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली असल्याने कमोडिटीत घसरण झाली. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.२७% घसरण झाली आहे.तर कच्च्या तेलाच्या निर्देशांकात मात्र आज वाढ झाली होती. युक्रेनने रशियावर हल्ला केल्यामुळे कच्च्या तेलाच्या निर्देशांकात दबाव पातळी निर्माण झाली ज्याचा फटका कच्च्या तेलाच्या किमतीत बसला. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०.८०%, Brent Future निर्देशांकात ०.५२% वाढ झाली आहे. एकत्रित विचार केल्यास मजबूत फंडामेंटलमुळे नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलण्यासाठी शेअर बाजार यशस्वी झाले.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एसीई (९.६५%), ईक्लर्क सर्विसेस (८.७६%), न्यूजेन सॉफ्टवेअर (६.२७%), किर्लोस्कर ब्रदर्स (४.६८%), वोडाफोन आयडिया (४.६७%), ज्यूब्लीएंट फूड (४.६३%), होंडाई मोटर्स (४.६३%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (४.३०%), बिकाजी फूडस (३.८४%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (३.६०%), झेन टेक्नॉलॉजी (३.१५%), इन्फोसिस (३.००%), टीसीएस (२.८४%), सोनाटा सॉफ्टवेअर (२.२९%), अदानी पॉवर (१.९१%), इन्फोऐज इंडिया (१.८१%), टाटा केमिकल्स (१.३०%),एचडीएफसी बँक (०.२३%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.३२%) समभागात झाली आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण सुंदरम फायनान्स (५.६५%), इमामी (४.३३%), सिटी युनियन बँक (३.३२%), एजंल वन (२.८५%), झी एंटरटेनमेंट (२.८१%), एचबीएल इंजिनिअरिंग (२.५४%), एल अँड टी फायनान्स (२.२५%), क्रिसिल (२.१४%), हिताची एनर्जी (२.१४%), युटीआय एएमसी (२.१३%), सीडीएसएल (२.१३%), बीएसई (१.८०%), न्यू इंडिया ॲशुरन्स (१.८३%), विशाल मेगामार्ट (१.१८%), अदानी एंटरप्राईजेस (०.९५%), अपोलो हॉस्पिटल (०.९०%), कजारिया सिरॅमिक्स (०.८३%), बँक ऑफ महाराष्ट्र (०.८६%), नेस्ले इंडिया (०.८५%), बाटा इंडिया (०.८१%), स्विगी (०.५३%), आयसीआयसीआय बँक (०.३८%) समभागात झाली आहे.

आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'सप्टेंबरमध्ये फेडकडून दर कपातीची अपेक्षा आणि त्यानंतर अमेरिकेच्या १० वर्षांच्या उत्पन्नात घट झा ल्यामुळे देशांतर्गत बाजारात आशावादाची लाट पसरली. अनुकूल जागतिक भावनांमुळे आयटी निर्देशांकाने चांगली कामगिरी केली. वापर मागणीला चालना देण्यासाठी प्रस्तावित जीएसटी तर्कसंगततेमुळे देशांतर्गत उत्पादक सकारात्मक राहिले आहेत आणि चांगला मान्सून हंगाम जागतिक व्यापार वातावरणातील कोणत्याही अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करू शकतो.'

आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'कॉमेक्स गोल्ड ३३६०-३३७० डॉलर्स दरम्यान व्यवहार करत असताना सोन्याच्या किमती एका मर्यादित श्रेणीत राहिल्या, गेल्या शुक्रवारी फेड चेअर पॉवेल यांनी जॅक्सन होलमधील आक्रमक भूमिकेमुळे सुरू झालेल्या मजबूत पुनरागमनानंतर ते मजबूत झाले, ज्यामुळे दर कपातीच्या अपेक्षांना बळकटी मिळाली. कॉमेक्स गोल्डची विस्तृत श्रेणी ३३३०-३३८० डॉलर्सवर कायम आहे, तर देशांतर्गत बाजारात, एमसीएक्स गोल्ड रुपयाच्या कमकुवतपणा आणि मजबूत परदेशातील ट्रेंडमुळे सकारात्मक पूर्वाग्रहाने व्यापार करत आहे. या पार्श्वभूमीवर, एमसीएक्स गोल्डला ₹१,००,००० वर मजबूत आधार मिळण्याची अपेक्षा आहे, तर प्र तिकार (Resistance) १०२००० रूपये पातळीवर दिसून येत आहे.'

आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या नकारात्मक भाषणामुळे जोखीम-संवेदनशीलतेला चालना मिळाल्याने जागतिक संकेतांवर लक्ष ठेवून भारतीय शेअर बाजार मजबूत राहिले. तथापि, निफ्टी २५००० पातळीच्या खाली आला आणि त्याच्या किंचित खाली बंद झाला. जोपर्यंत निर्देशांक २४८०० पातळीच्या वर राहील तोपर्यंत ही भावना सकारात्मक राहील. नजीकच्या काळात, विशे षतः मंगळवारी, भारतीय बाजार उलट दिशेने व्यापार करू शकतो कारण व्यापारी २७ ऑगस्ट रोजी ट्रम्पच्या अतिरिक्त २५% टॅरिफ निर्णयावर अंतिम निर्णयाची वाट पाहत आहेत. कोणत्याही निर्णायक दिशात्मक हालचालीपूर्वी निफ्टी २४८००-२५१५० पातळी च्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे.'

आजच्या बाजारातील रूपयावर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'सप्टेंबर २०२५ मध्ये फेडने दर कपातीचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर डॉलर निर्देशांक ९८.०० च्या दिशेने किरकोळ वाढ दर्शवि ल्याने रुपया ०.०७ ने कमकुवत होऊन ८७.५८ पातळीवर व्यवहार करत होता. रुपया किरकोळ वाढीसह उघडला असला तरी, डॉलरची ताकद पुन्हा वाढल्याने त्याने लवकरच वाढ सोडली. भारतीय बाजारपेठेत परदेशी गुंतवणूकदार निव्वळ विक्रेते राहिल्याने सततचा एफआयआय बहिर्गमन भाव भावनेवर परिणाम करत आहे. याव्यतिरिक्त, भारतावरील अमेरिकेच्या टॅरिफ भूमिकेबद्दलच्या नव्या चिंता रुपयाच्या वाढीच्या क्षमतेला आणखी कमी करत आहेत. पुढे जाऊन, पॉवेलची धोरणात्मक भूमिका, जागतिक क्रूड ट्रें ड आणि एफआयआय प्रवाह दिशानिर्देशासाठी महत्त्वाचे आहेत. रुपयाला आधार ८७.९५–८८.१० पातळीवर दिसत आहे, तर प्रतिकार ८७.२५–८७.५० पातळीवर आहे.'

त्यामुळे आजही अस्थिरता कायम असली तरी शेअर बाजाराने वाढ नोंदवली आहे. सप्टेंबरमध्ये होणारी व्याजदरात कपात व युएस बाजारातील आगामी जीडीपी व पीसीई आकडेवारी वगळता नवीन ट्रिगर नाही त्यामुळे उद्याही बाजारात वाढ होते का हे पाहणे मह त्त्वाचे ठरेल. तरीही निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात जीएसटी कपातीचा श्रेत्रीय विशेष परिणाम उदयाही कायम राहिला तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढल्यास निर्देशांकातील अस्थिरता मात्र आजप्रमाणे कायम राहू शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >