Thursday, August 28, 2025

Parineeti Chopra Pregnancy News : गुडन्यूज!"आमचं छोटं युनिव्हर्स येतंय", चड्ढा कुटुंबात लवकरच छोटं पाहुणं...परिणीतीच्या पोस्टने इंस्टाग्राम हँग

Parineeti Chopra Pregnancy News : गुडन्यूज!

बॉलीवूडमधील चर्चेत असलेल्या पॉवर कपलपैकी एक, अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आमदार राघव चड्ढा यांनी अखेर चाहत्यांना गोड आनंदाची बातमी दिली आहे. नुकतेच हे जोडपे कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये दिसले होते. त्या वेळी राघवने, “लवकरच एक खास आनंदाची बातमी मिळेल”, असा गूढ संकेत दिला होता. चाहत्यांच्या उत्सुकतेला आता पूर्णविराम मिळाला आहे. परिणीती चोप्राने थेट सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. आनंदाची ही बातमी जाहीर होताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांसह बॉलीवूडमधील सेलिब्रिटी मित्रमंडळींनी या जोडप्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. परिणीती आणि राघव यांनी २०२३ मध्ये भव्य लग्नसोहळा करत आयुष्याची नवी सुरुवात केली होती. लग्नानंतर दोघेही सतत चर्चेत राहिले. आता काही महिन्यांत त्यांच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक खास फोटो शेअर करून चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. या फोटोमध्ये चिमुकल्याचे पायाचे ठसे दिसत असून, त्यासोबत "१+१ = ३" असा मजकूर लिहिला आहे. या अनोख्या पद्धतीने तिने तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. याच पोस्टला तिने भावनिक कॅप्शन देत लिहिलं – “आमचं छोटं युनिव्हर्स लवकरच येत आहे.” परिणीतीच्या या पोस्टने काही मिनिटांतच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनीदेखील अभिनंदनाचा वर्षाव करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी पोस्टखाली हार्ट इमोजी टाकले, तर काहींनी “बेस्ट न्यूज” असं लिहून आनंद व्यक्त केला. परिणीती-राघव यांच्या आयुष्यात येणाऱ्या या छोट्या पाहुण्याच्या स्वागतासाठी फॅन्सनी आतापासूनच तयारी सुरू केली असल्याचं दिसत आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by @parineetichopra

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे तरुण खासदार राघव चड्ढा यांनी २०२३ मध्ये राजस्थानमधील भव्य समारंभात लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या या विवाह सोहळ्याला राजकीय आणि सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. लग्नानंतर तब्बल दोन वर्षांनी आता या जोडप्याने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. परिणीती आणि राघव लवकरच आई–बाबा होणार असून, या नव्या टप्प्यामुळे ते दोघेही अतिशय आनंदी आहेत. राघव चड्ढा हे राजकारणात सक्रीय असून, दिल्लीहून आम आदमी पक्षाचे खासदार म्हणून ते कार्यरत आहेत. तर परिणीतीने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दोघांच्याही व्यग्र व्यावसायिक आयुष्याच्या दरम्यान आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या आनंदवार्तेने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा