
मोहित सोमण: आजपासून NIS Management Limited, Globtier Infotech Limited या दोन कंपनीचे आयपीओ शेअर बाजारात दाखल झालेला आहे .दोन्ही आयपीओ बीएसई एसएमई (BSE SME) प्रवर्गात सूचीबद्ध (Listed) होणार आहेत. जाणून घ्या या दोन्ही आयपीओची माहिती इत्यंभूत माहिती एका क्लिकवर -
१) NIS Management Limited- एनआयएस मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचा आयपीओ बाजारात आज दाखल झाला आहे. आज २५ ऑगस्ट ते २८ ऑगस्टपर्यंत आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात उपलब्ध असेल. १०५ ते १११ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित करण्यात आला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान २५२०००.०० रूपयांची (२४०० शेअर) गुंतवणूक करणे अनिवार्य असेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओसाठी ०.४७ कोटी शेअरचा फ्रेश इशू असणार आहे तर ०.०७ कोटी शेअर ऑफर फॉर सेलसाठी असतील. Share India Capital Services Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे तर मार्केट मेकर म्हणून Share India Securities Limited ही कंपनी काम करणार आहे.
माहितीनुसार,पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना आयपीओचे वाटप (Allotment) २९ ऑगस्टला होणे अपेक्षित आहे. २ सप्टेंबरला कंपनी बाजारात सूचीबद्ध (Listed) होईल. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी मार्केट मेकरसाठी ६.१०% वाटा, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) यांच्यासाठी ४६.५०% पर्यंत वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) साठी १४.३२ पर्यंत वाटा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investment) ३३.०७ पर्यंत वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. यापूर्वीच कंपनीने अँकर गुंतवणूकदारकडून (Anchor Investors) १६.७२ कोटी रुपये उभारले आहेत. १९८५ साली या कंपनीची स्थापना झाली होती. कलकत्ता स्थित ही कंपनी सिक्युरिटी, फॅसिलिटी मॅनेजमेंट, इलेक्ट्रॉनिक्स सर्वेलंन्स, पेरोल प्रोसेसिंग, हाऊसकिपिंग यांसारख्या विविध उत्पादने व सेवा कंपनी पुरवते.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीच्या महसूलात ७% वाढ झाली आहे तर करोत्तर नफ्यात (PAT) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २% वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या मार्च तिमाहीतील ३८०.०६ कोटींच्या तुलनेत वाढत या मार्च तिमाहीत कंपनीला ४०५.३३ कोटीचे उत्पन्न मिळाले होते. कंपनीच्या करोत्तर नफा (PAT) इयर ऑन इयर बेसिसवर मागील वर्षाच्या १८.३८ कोटींच्या वाढत १८.६७ कोटी झाला आहे. कंपनीच्या ईबीटा (EBITDA) मध्ये मागील वर्षाच्या तिमाहीतील ३१.१२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत घसरत २६.३० कोटीवर गेला आहे. कंपनीने एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) २१९.७८ कोटी रुपये आहे.
देबाजित चौधरी, रिना चौधरी, सुमिता चौधरी, देबाहुती चॅटर्जी, निता डे हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ९५.९९ % होते ते आयपीओनंतर घसरत ६९.६३% होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी खेळत्या भांडवलासाठी (Working Capital Requirements), दैनंदिन कामकाजासाठी करणार असल्याचे कंपनीने म्हटले.
कंपनीला पहिल्या दिवशी किती सबस्क्रिप्शन मिळाले?
कंपनीला पहिल्या दिवशी एकूण ०.२६ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून ०.११ वेळा, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ० वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) ०.९३ वेळा आयपीओला सबस्क्रिप्शन मिळाले आहे.
२) Globtier Infotech Pvt Ltd- ग्लोबटिअर इन्फोटेक लिमिटेड कंपनीचा आयपीओ आज २५ ते २८ऑगस्ट या कालावधीत बाजारात दाखल होत आहे. ३१.०५ कोटी मूल्यांकनाचा हा आयपीओ असेल. ०.३८ कोटींच्या शेअरचा फ्रेश इशू वाटप करण्यात येईल. तर ऑफर फॉर सेलसाठी ०.०५ कोटी शेअर उपलब्ध असतील. २ सप्टेंबरला कंपनी बाजारात सूचीबद्ध होईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओचा प्राईज बँड ७२ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. Shannon Advisors Private Limited ही कंपनी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Skyline Financial Services Limited आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. मार्केट मेकर म्हणून Nikunj Stock Brokers Limited कंपनी आयपीओसाठी काम पाहेल. १० रूपयांच्या दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या शेअरचा १६०० शेअरचा एक गठ्ठा (Lot) विक्रीसाठी उपलब्ध असेल. या आयपीओसाठी गुंतवणूकदारांना कमीत कमी २३०४००.०० (३२०० शेअर) खरेदी करणे अनिवार्य असेल. राजीव शुक्ला, रेखा शुक्ला, राहुल शुक्ला हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ९९.८७% होते ते आयपीओनंतर घसरत ७१.३९% वर खाली येणार आहे. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी मार्केट मेकरसाठी ५.१९% पर्यंत वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. तर ४७.३१% वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, ४७.५०% वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले.
२०१२ साली ही कंपनी स्थापन झाली होती. उत्तर प्रदेश स्थितीत ही कंपनी आयटी व सॅप सेवा प्रदान करते. कंपनी नाविन्यपूर्ण वर्कफ्लोद्वारे व्यवसाय कामगिरी वाढवण्याच्या उद्देशाने विविध आयटी सोल्यूशन्स ऑफर करते. गेल्या दशकात, ग्लोबटियरने अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदान करण्यासाठी आणि उत्कृष्ट वापरकर्ता अनुभव सुनिश्चित करण्यासाठी प्रतिष्ठा निर्माण केली आहे. कंपनी क्लायंट-केंद्रित दृष्टिकोनाचे अनुसरण करते, वैयक्तिकृत सहभागावर लक्ष केंद्रित करते आणि ग्राहकांच्या गरजांनुसार सेवा संरेखित करते. अलीकडेच, कंपनीने ऑफरिंगमध्ये व्यापक संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी तिच्या सायबर सुरक्षा सेवांमध्ये वाढ केली आहे.त्यांच्या सेवा विविध व्यवसाय वर्टिकलमधील लहान, मध्यम आकाराच्या आणि स्टार्टअप उद्योगांना सेवा देतात.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ७% वाढ झाली होती. तर इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीच्या करोत्तर नफ्यात ४७% वाढ झाली होती. कंपनीच्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या मार्च तिमाहीतील ८८.२७ कोटी तुलनेत वाढ होत या वर्षाच्या तिमाहीत ९४.८१ कोटींवर पोहोचला होता. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) मध्ये मागील वर्षाच्या तिमाहीतील ३.७४ कोटींच्या तुलनेत या वर्षाच्या तिमाहीत वाढत ५.५० कोटींवर पोहोचले आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल १०८.८७ कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी खेळत्या भांडवलासाठी, दैनंदिन कामकाजासाठी, थकबाकी चुकवण्यासाठी, अँडव्हान्समध्येच पैसै भरण्यासाठी करण्यात येणार आहे.
कंपनीला पहिल्या दिवशी किती सबस्क्रिप्शन मिळाले?
कंपनीच्या आयपीओला पहिल्या दिवशी एकूण ०.३६ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून ०.५० वेळा, तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०%, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.२२ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे.