
मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर झाला आहे. नव्या आठवड्याची सुरुवात पावसाने झाली आहे. मुंबईकरांची सोमवारची (२५ ऑगस्ट २०२५) सकाळ मुसळधार पावसाच्या आगमनाने झाली. मुंबईच्या अनेक भागात अवघ्या एका तासात २० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने मंगळवार २६ ऑगस्ट आणि बुधवार २७ ऑगस्टसाठी मुंबईला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. शहर आणि उपनगरातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रविवार २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ ते सोमवार २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७ या वेळेत मुंबई शहरात सरासरी १२.४१ मिमी. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांत १३.८४ मिमी. आणि पश्चिम उपनगरांत १८.०४ मिमी. पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळी ६ ते ७ या वेळेत सर्वात जास्त पाऊस पडला. वडाळा येथील बी. नाडकर्णी पार्क म्युनिसिपल स्कूलमध्ये २९ मिमी., शिवडी कोळीवाडा म्युनिसिपल स्कूलमध्ये २५ मिमी. आणि दादरमधील स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्कशॉपमध्ये २४ मिमी. पावसाची नोंद झाली. धारावीच्या काला किल्ला स्कूलमध्ये १९ मिमी. आणि वरळी नाका येथे १६ मिमी. पावसाची नोंद झाली. मानखुर्द अग्निशमन केंद्रात २८ मिमी., गोवंडीतील शिवाजी नगर महानगरपालिका शाळा आणि नूतन विद्या मंदिर येथे प्रत्येकी २४ मिमी. चेंबूर अग्निशमन केंद्र आणि मानखुर्दमधील एमपीएस महाराष्ट्र नगर येथे २३ मिमी. तर घाटकोपरच्या रमाबाई शाळेत २१ मिमी. पावसाची नोंद झाली. बीकेसी अग्निशमन केंद्रात २६ मिमी. वांद्रे येथील पाली चिंबाई म्युनिसिपल स्कूलमध्ये २३ मिमी. सांताक्रुझच्या नारियालवाडी स्कूलमध्ये आणि वांद्रेच्या सुपारी टँक स्कूलमध्ये २२ मिमी. अंधेरीच्या चकाला म्युनिसिपल स्कूलमध्ये १७ मिमी., एचई वॉर्डमध्
सोमवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू राहतील, परंतु कोकण किनाऱ्यावर मान्सूनचा प्रवाह मजबूत होत असल्याने आठवड्याच्या मध्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान २७ ते ३१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.