Monday, August 25, 2025

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज
मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात झालीय. राज्यात २८, २९, ३० आणि ३१ ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर कोकणात २८ ऑगस्टला अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सोमवारी सकाळपासून मुंबईसह, ठाणे आणि उपनगरातही रविवारपासून पाऊस आहे. पावसामुळे पुणे-बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी झाली आहे. याचा परिणाम गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. त्याशिवाय मुंबईत अनेक मंडळांच्या गणपती बाप्पांचं रविवारी वाजत गाजत आगमन होत आहे. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असून बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसते आहे. मुंबईत पावसाचा लोकल ट्रेनवर परिणाम झाला आहे. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. याचा परिणाम लोकल ट्रेनवर झालेला आहे. हार्बर ट्रेन उशिराने धावत असून मध्य रेल्वेवरही वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहे. मुंबईत सकाळपासून पावासाने हजेरी लावली असून पावसाचा जोर वाढला आहे. कोकणात २५ ते ३१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २८ ऑगस्ट रोजी अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
Comments
Add Comment