गोडवा आणि तिखटपणाची मेजवानी – ‘वडापाव’ चित्रपटाचा चविष्ट टीझर प्रदर्शित!

  29

मुंबई : मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीत वडापावचं स्थान खास आहे . वडापाव म्हटलं की जिभेला पाणी सुटतं. वडा जसा तिखट-चुरचुरीत असतो तसंच नात्यांमध्येही गोडवा आणि तिखटपणा असला तरच ती नाती खरी रंगतदार होतात. अगदी हाच अनुभव देणारा कौटुंबिक चित्रपट 'वडापाव' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाल टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून टीझरवरून हा चित्रपट एक गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असणार हे स्पष्ट होतंय. ही रुचकर पाककृती प्रसाद ओक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रसाद ओक यांच्या अभिनय कारकिर्दीतील शंभरावा चित्रपट असल्यामुळे ते पहिल्यांदाच एकाच वेळी दिग्दर्शक आणि अभिनेते अशा दुहेरी भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे हा प्रवास अधिकच संस्मरणीय ठरणार आहे.


टीझर अत्यंत सुटसुटीत आहे. धमाल मनोरंजन आणि कौटुंबिक मूल्यांचा संगम असलेली ही कथा प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनर अंतर्गत, प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटाचे अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत. तर सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल असून संजय मेमाणे हे चित्रपटाचे छाया दिग्दर्शक आहेत. तर सिद्धार्थ साळवी यांनी चित्रपटाचं लेखन केले आहे.


दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, ‘’ 'वडापाव' एक अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतेच. हाच आमच्या चित्रपटाचा गाभा आहे. कुटुंब, त्यांच्या नात्यांतील गोडवा-तिखटपणा आणि त्यातून मिळणारा भावनिक व विनोदी अनुभव अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडावा, असाच आमचा प्रयत्न आहे.’’


निर्माते अमेय खोपकर म्हणतात, ''मराठी प्रेक्षक कौटुंबिक चित्रपटांवर नेहमी प्रेम करतात. ‘वडापाव’ ही कथा त्यांच्या मनात नात्यांची खरी चव रुजवेल. टीझरवरूनच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आलं, हेच आमचे पहिले यश आहे. हा सिनेमा हसवणार, रडवणार आणि विचार करायलाही लावणार.''


निर्माते निनाद बत्तीन म्हणतात, ‘’ वडापावचा जसा घरातील तीन पिढ्या मनसोक्त आस्वाद घेतात तसाच आमचा चित्रपट ‘वडापाव’ तीन पिढ्यांची गोष्ट सांगतो. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे. तो घराघरांत पोहोचेल आणि लोकांना आवडेल यात शंका नाही.’’


निर्माते अमित बस्नेत म्हणाले, ''मी मुळात नेपाळचा असून मला मराठी संस्कृती, खाद्यपदार्थ, साहित्य, कला यांबद्दल नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. यापूर्वी मी ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाची निर्मिती केली होती आणि आता ‘वडापाव’ची निर्मिती करत आहे. मराठी खाद्यपदार्थ हे मुळात भावनांशी जोडले गेलेले आहेत. वडापाव त्यापैकीच एक. जीवनात आपुलकीसोबत थोडा तिखटपणा हवाच. नाहीतर नातं फिकं पडतं. हाच बॅलन्स दाखवणारा हा चित्रपट आहे. टीझर पाहूनच प्रेक्षकांना जाणवलंय की, ही कथा अगदी त्यांच्या घरासारखीच आहे. ओळखीची, तरीही नव्या चवीची.''

Comments
Add Comment

२५० कोटींचा अलिशान बंगला तयार, रणबीर-आलिया लवकरच करणार गृहप्रवेश

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर अखेर तयार झाले आहे. गेल्या अनेक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

Parineeti Chopra Pregnancy News : गुडन्यूज!"आमचं छोटं युनिव्हर्स येतंय", चड्ढा कुटुंबात लवकरच छोटं पाहुणं...परिणीतीच्या पोस्टने इंस्टाग्राम हँग

बॉलीवूडमधील चर्चेत असलेल्या पॉवर कपलपैकी एक, अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आमदार राघव चड्ढा यांनी अखेर

महाराष्ट्रीय भाऊ'ची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री, सलमान खानने केली खास मराठमोळा 'पाहुणचार'

मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन, ज्याला 'महाराष्ट्रीय भाऊ' म्हणून ओळखले जाते, त्या प्रणित मोरेने 'बिग बॉस 19'च्या

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा