Saturday, August 23, 2025

साप्ताहिक राशिभविष्य, २४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, २४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, २४ ते ३० ऑगस्ट २०२५

समस्या सुटतील

मेष : हा आठवडा आपल्यासाठी अतिशय चांगला आहे. कामामध्ये कितीही अडचणी आल्या तरी आपण आपले कार्य पूर्ण करणार आहात. आपल्या उत्साहामुळे आपली कामे सहज व शांततेत होतील. या कालावधीमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात धाडसाचे निर्णय घ्याल. आपल्या घरामध्ये कौटुंबिक कार्यक्रम होऊ शकतात. आरामदायी वस्तूंवर व थोडा चैनीवर खर्च होणार आहे. खर्चावर आपले लक्ष असू द्यावे. आपल्या आरोग्यावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जेवण, खाणे-पिणे नियमित ठेवणे गरजेचे आहे. महिलांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील. तसेच एखादे मंगल कार्य किंवा धार्मिक कार्य घडू शकते. प्रवासकार्य सिद्ध होतील.

मानसन्मान वाढेल

वृषभ : शुभ ग्रहांचे भ्रमण आपल्यासाठी चांगले आहे. आपल्या बुद्धिचातुर्याने व कार्यकुशलतेने आपली दीर्घकाळ रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यात यश मिळेल. समाजातील मान्यवर व सन्माननीय व्यक्तींमुळे आपण आपले कार्ये पूर्ण करू शकाल. मानसन्मान वाढेल. आपण घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. तुम्ही आनंदी असणार आहात. आपल्या कल्पना खूप चांगल्या असल्याने लोक त्याची प्रशंसा करतील. काही अशुभ ग्रहांच्या भ्रमणामुळे व्यावसायिक भागीदारीमध्ये तुमच्यासमोर समस्या उभ्या राहतील. व्यापार-व्यवसायात काही निर्णय चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण स्वतः निर्णय घ्यावेत. जास्त धोका पत्करू नका. नात्यासंबंधी काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रगती होईल.

कामे मार्गी लागतील

मिथुन : आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे. आपल्या समोरील कामे आपण उत्साहाने पूर्ण करू शकाल. जमीन-जुमला, स्थावर मालमत्ता याविषयीची कामे मार्गी लागतील. ओळखी-मध्यस्ती यशस्वी होतील. आपले विचारही सकारात्मक असणार आहेत. आपले कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी चांगले प्रयत्न होतील. परदेशातूनही चांगल्या संधी येण्याची शक्यता आहे. आपल्यातील कम्युनिकेशन स्कील हे व्यवसाय वाढवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यातून आर्थिक लाभाची अपेक्षा पूर्ण होणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहणार आहे. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. आर्थिक स्थैर्याचा कालावधी आहे.

सुसंवाद राहणार आहे

कर्क : या सप्ताहात यशाचा आणि समृद्धीचा काळ असणार आहे. आपला कल्पक दृष्टिकोण आणि संधीमुळे तुम्हाला थोडे अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी सुसंवाद राहणार आहे. आपल्या कार्यकुशलतेमुळे वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचे आपणास सहकार्य लाभणार आहे. यामुळे आपली प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे. एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. परदेशगमनाचे योग. मात्र या कालावधीमध्ये घराकडे फार दुर्लक्ष करू नका. अधिक काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा कुटुंबामध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या सतर्क राहा.

नवीन करार-मदार होतील

सिंह : या सप्ताहामध्ये तुम्ही पूर्णपणे आत्मविश्वासपूर्वक काम करणार आहात. सरकार किंवा सार्वजनिक जीवनात तुम्ही तुमच्या सत्तेचे आणि अधिकाराचे वजन वापरू शकाल. मुक्त हस्ते खर्च कराल. आपण कोणतेही काम धाडसाने करणार आहात. आपण मोठी झेप घेणार आहात. पूर्वीचे नियोजन सफल होईल. व्यवसाय धंद्यामध्ये काही नवीन करार-मदार होतील. काही फायद्याचे सौदे हाती येतील. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराच्या मताला उचित प्राधान्य देणे हितकारक ठरेल. वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल.

नवीन व्यवसाय होऊ शकतो

कन्या : आपण फार आक्रमक होऊ नका. आपल्या हट्टावर नियंत्रण ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात इतर कोणाचाही अपमान करू नका. त्याचप्रमाणे कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नका. वादविवाद टाळा. सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणतेही मोठे काम स्वीकारताना पूर्णपणे विचार करा. नवीन व्यवसाय होऊ शकतो. आपणास कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळणार आहे. व्यावसायिक पातळीवर चांगल्याप्रकारे प्रगती होईल.

नवीन मार्ग सापडतील

तूळ : वरिष्ठांकडून किंवा प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही चांगली प्रगती करणार आहात. आपल्या कारकिर्दीमध्ये आणि कौटुंबिक पातळीवर अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे. तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबीयांसोबत सलोख्याचे संबंध कसे ठेवावेत यासंबंधी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. आपल्या व्यापार-व्यवसायात, कार्यक्षेत्रामध्ये कौशल्याने आणि बारकाईने लक्ष देणे फार आवश्यक आहे. कुठे नुकसान होते का याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील.

आनंदाचे क्षण मिळतील

वृश्चिक : स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा सप्ताह अनुकूल आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित बदल घडणार आहेत. काही महत्त्वाची कामे सहजी झाल्याने आपल्याला आश्चर्य वाटू शकते. आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहेत. भागीदार किंवा सहकाऱ्यांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारांकडून तुम्हाला आनंदाचे क्षण मिळतील. आरोग्याकडे लक्ष देणे चांगले. मनःशांती ढळू देऊ नका. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल.

गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ

धनु : आपला नेहमी दृष्टिकोन सकारात्मक असतो. आपल्या राशीचा चांगला कालखंड आहे. गुंतवणुकीसाठी हा अनुकूल काळ आहे. मात्र नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आपल्याला जवळच्या सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात काही नवीन आव्हाने समोर येतील, त्यावर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवणार आहात. व्यवहार सुरळीत आणि सहज पार पडतील. स्पर्धकांच्या एक पाऊल पुढेच असाल.

मार्गदर्शन मिळेल

मकर : या सप्ताहात नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे नक्कीच चांगले. नातेसंबंधात वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. आपण सकारात्मक राहिलात तर कामाचे आणि समाजाशी संबंधित तुमची तत्त्वे व्यक्त करताना तुम्ही यशस्वी होणार आहात. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवू शकता. आर्थिक आवक वाढणार आहे. काही घटना मनाविरुद्ध घडल्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. मात्र अपेक्षा भंगामुळे चुकीचे निर्णय घेऊ नका. कोणतेही निर्णय घेताना शांतचित्ताने व पूर्ण विचारांती निर्णय घ्या. इतरांचे मार्गदर्शन मिळेल. वादविवाद टाळा. कुटुंबात ताणतणावाचे प्रसंग येऊ शकतात. आर्थिक लाभ होतील.

प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे ठरणार आहे

कुंभ : आपण आपल्या नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवणार आहात. या सप्ताहात आपल्याला नशिबाची साथ कमी मिळणार आहे. आपण आपल्या कार्यात कार्यमग्न राहून प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निराश न होता आपले कार्य चालू ठेवा. उद्योग व्यवसायात भागीदार व्यक्तींकडून अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. अति आत्मविश्वास आपल्यासाठी फारसा चांगला नाही. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवे प्रकल्प किंवा मोठे बदल करणे टाळा. आपण या कालावधीमध्ये सकारात्मक असणे फार गरजेचे आहे. तुमच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. सरकार व प्रशासनासोबत काम करणार आहात. आपल्या कामांमध्ये यश येणार आहे.

अडचणींपासून दिलासा

मीन : आपल्याला या सप्ताहामध्ये ताण-तणावापासून आणि अडचणींपासून दिलासा मिळणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामाची पूर्तता होण्यासाठी आपण जे काही प्रयत्न केले होते त्याचे फळ आपल्याला मिळणार आहे. ताण-तणावापासून मुक्तता मिळेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून आपल्याला सहकार्य मिळणार आहे. मात्र या कालावधीमध्ये आपला स्वभाव आक्रमक बनण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्तरावर तुमची प्रगती होणार आहे. आपणास प्रभावशाली व्यक्तींकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये समृद्धी लाभेल. नोकरीमध्ये प्रगती होईल.
Comments
Add Comment