Sunday, August 24, 2025

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या नियमांचं पालन केलं नाही, तर घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशीच एक वस्तू म्हणजे कात्री. अनेकदा आपण नकळत कात्री वापरताना अशा काही चुका करतो, ज्या आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात.

वास्तुशास्त्राचे नियम आणि कात्रीचा वापर

उघडी कात्री ठेवू नका: कधीही कात्री उघडी ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार, उघडी कात्री घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. नेहमी कात्री बंद करून किंवा तिच्या कव्हरमध्ये ठेवली पाहिजे.

इतरांकडून कात्री घेऊ नका: ज्योतिषशास्त्रानुसार, कोणतीही धारदार वस्तू, जसे की कात्री, चाकू किंवा सुई, दुसऱ्याकडून घेऊ नये. असं मानलं जातं की यामुळे संबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो.

भेट म्हणून देऊ नका: कात्री किंवा इतर कोणतीही धारदार वस्तू कोणालाही भेट म्हणून देऊ नये. असं करणं अशुभ मानलं जातं.

योग्य दिशेत ठेवा: वास्तुशास्त्रानुसार, कात्री योग्य दिशेत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ती नेहमी दक्षिण दिशेला ठेवणे टाळा. असं केल्यास कुटुंबात कलह वाढू शकतो. कात्री ठेवण्यासाठी सर्वात चांगली दिशा दक्षिण-पश्चिम आहे. या दिशेला ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर राहते.

कात्रीशी संबंधित इतर महत्त्वाचे नियम

अनावश्यकपणे कात्री चालवू नका: काही लोकांना रिकाम्या वेळेत उगाच कात्री उघड-बंद करण्याची सवय असते. वास्तुशास्त्रानुसार, असं करणं अशुभ आहे. त्यामुळे पैशांचे नुकसान होते आणि घरात गरिबी येते.

कात्री कधी विकत घ्यावी: शनिवारी किंवा रविवारी कात्री खरेदी करू नये. गुरुवार हा दिवस कात्री विकत घेण्यासाठी शुभ मानला जातो.

गंजलेली कात्री वापरू नका: घरात गंजलेली किंवा तुटलेली कात्री ठेवू नका. अशी कात्री त्वरित घराबाहेर काढली पाहिजे. यामुळे घरात नकारात्मकता वाढते.

वास्तुशास्त्रानुसार, या लहान-सहान गोष्टींचे पालन केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. कात्री वापरताना या नियमांचे पालन केल्यास तुम्ही अनेक अडचणींपासून स्वतःचा बचाव करू शकता.

Comments
Add Comment