
मुंबई : गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत. राज ठाकरेंच्याकडून आलेल्या आमंत्रणाला मान देत उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत.
मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे वारंवार एकत्र दिसत आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शिउबाठा आणि मनसेने युती केली होती. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना दर्शनाला येण्यासाठी आमंत्रण मिळाले आहे. या आमंत्रणाचा मान राखणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरेंकडून देण्यात आले आहेत. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी लवकरच सरप्राइज मिळेल, असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.
राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती आहे. या गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहेत.