Sunday, August 24, 2025

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक कार्याची दखल घेत मंडळाकडून विविध क्षेत्रांतील व्यक्तींना 'आरतीचा मान' दिला जातो. यंदा हा खास सन्मान जोगेश्वरी पूर्व येथील कोकण नगर गोविंदा पथकाला जाहीर करण्यात आला आहे.

या वर्षी दहीहंडी उत्सवात कोकण नगर गोविंदा पथकाने सर्वात आधी १० थर रचून विश्वविक्रम केला होता. हा विक्रम करणाऱ्या कोकण नगर गोविंदा पथकाला मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पहिल्या आरतीचा मान दिला आहे. पहिल्या आरतीचा मान देत मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विश्वविक्रम करणाऱ्या कोकण नगर गोविंदा पथकाचा गौरव केला आहे.

सन्मान स्वीकारण्यासाठी कोकण नगर गोविंदा पथकाचे प्रतिनिधी शनिवार, ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ७:३० वाजता मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वागत कक्षात उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने यंदाचा गणेशोत्सव कोकण नगर गोविंदा पथकासाठी अधिकच अविस्मरणीय ठरणार आहे.

Comments
Add Comment