Sunday, August 24, 2025

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही परिस्थितीत गावाला जाणं. मंत्री नितेश राणे यांनी कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात आली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सालाबादाप्रमाणे यावर्षीही मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल दोन विशेष ट्रेन सोडण्यात आल्या काल (शनिवार) आणि आज रविवारी अश्या दोन मोदी एक्सप्रेस गावाला निघाल्या.

 

आज मंत्री नितेश राणे आ यांच्या उपस्थिती सुटली. गणेशोत्सव ही आपल्या कोकणाची ओळख, या गणेशोत्सवाला संपूर्ण गाव गजबजून जातं. नोकरी-धंद्यासाठी मुंबई-ठाणे सारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या कोकणवासियांना गावच्या गणेशोत्सवाची ओढ असते.

https://youtu.be/W--Y13GzL8E

अशा कोकणवासियांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी राणे कुटुंबीयांच्या पुढाकारातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोडण्यात येणाऱ्या 'मोदी एक्सप्रेस' या गणपती विशेष रेल्वेचे आज दादर येथून प्रस्थान झाले. विशेष म्हणजे हे 'मोदी एक्सप्रेस'चे १३वे वर्ष आहे.यावेळी "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया" अशा जयघोषाने वातावरण भारले होते. सर्व कोकणवासियांच्या मनात कोकणच्या लाल मातीची ओढ आणि चेहऱ्यावर भक्तिमय उत्साह दिसत होता.

या उपक्रमामुळे सणांच्या दिवसात होणारी गर्दी आणि खासगी वाहतुकीचा खर्च टाळून हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे प्रशासनाकडूनही अनेक जादा रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र अनेक रेल्वे गाड्यांचे बुकिंग आधीच फूल्ल झालं आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणातील राणे कुटुंबीयांकडून मुंबईतून थेट गावी जाण्यासाठी स्पेशल दोन रेल्वे गाड्या सोडल्या गेल्या आहेत.नुकतीच या दोन्ही मोदी एक्सप्रेस गाड्यांची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली होती. या उपक्रमाचे हे १३वे वर्ष आहे. गणेशोत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान साजरा होणार असून, 11 ऑगस्टपासून गणपती विशेष रेल्वे सेवा सुरू झाल्या आहेत. या विशेष रेल्वे सेवांचा विस्तार कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर झाला आहे. या विशेष रेल्वेगाड्यांचे थांबे वाढविले आहेत.

Comments
Add Comment