Sunday, August 24, 2025

मुलांना चांगल्या सवयी कशा लावाल?

मुलांना चांगल्या सवयी कशा लावाल?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू

लहानपणापासून मुलांना चांगल्या गोष्टी किंवा संस्कार दिल्यास भविष्यात हीच मुलं संपूर्ण समाजाला एक चांगली दिशा दाखवू शकतात. त्यामुळे लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांनी खेळण्यातून किंवा वागण्या-बोलण्यातून प्रेमानं काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊ...

ॲटॉमिक हॅबिट पुस्तकानुसार आपण आपल्या चुकीच्या, वाईट सवयी मोडून चांगल्या सवयी कशा लावू शकतो तर मुलांनो तुमच्या रोजच्या सवयीत केलेला छोटासा बदलही तुमच्या आयुष्यात तुम्ही ठरवलेल्या करिअरपर्यंत पोहोचायला मदत करतो. आपल्या लक्षातही येत नाही की गेली कित्येक वर्ष अशा सवयी मग त्या चांगल्या असो की वाईट आपल्याला लागत असतात. थोडा प्रयत्न सतत केलात तरी रोज १% बदल होत असतो.

मुलांनो तुम्हाला यशस्वी होण्यासाठी एकदा केलेला मोठा बदल नाही तर रोज सातत्याने अभ्यास करण्याच्या सवयी जास्त उपयोगी ठरतात. प्रगतीचं रहस्य काय आहे, तर छोटे-छोटे बदल जे सुरुवातीला तुम्हाला आणि इतरांना दिसत नाही आणि त्यामुळे याला निराशेची दरी म्हणतात. मुलांनो, तुम्हाला आणि पालकांनाही वाटेल की या प्रयत्नांनी तर काही विशेष होत नाही मग मनुष्यस्वभावानुसार तुम्ही प्रयत्न सोडून देता. जुन्या सवयीच बऱ्या असं तुम्हाला वाटतं. वेळेवर अभ्यास करू. कशाला रोज थोडा थोडा अभ्यास करायचा असा विचार मनात येणारच तुमच्या पण लक्षात ठेवा ही शांतपणे धीम्या गतीने चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे संयम, पेशन्स ठेवावा लागतो. सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला सांभाळून वापरा. एकाच दिवसात तिचा उपयोग केलात तर तोटा होईल असं गोष्टीत सांगतात. तसाच संयम अभ्यास करताना ठेवावा लागतो. टिटवीने समुद्र आटवला तो कसा? याही गोष्टीत तिचे छोटेसे अथक प्रयत्न, तिचा पेशन्स, संयम, सातत्य हेच यशासाठी उपयोगाला आलं. थेंबे थेंबे तळे साचे हे तर ऐकलंच असेल तुम्ही. मधमाशादेखील थोडा थोडा मध रोज गोळा करतात तेव्हा मधाचं पोळं बनतं.

अभ्यासाच्या सवयी लावताना जसं उद्दिष्ट किंवा काय साध्य करायचं आहे त्याचा गोल ठरवतो त्याहीपेक्षा जास्त ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आपण कोणती पद्धत, क्रिया वापरतो ते जास्त महत्त्वाचं ठरतं. उद्दिष्ट काय करतं तर तुम्हाला कुठे पोहोचायचं ते ठरवतं आणि काम, पद्धत तिथे पोहोचायला आणि अभ्यासाचे रिझल्टस मिळवण्यासाठी तुम्हाला मदत करते कारण अभ्यासासाठी तुम्ही जे छोटे-छोटे प्रयत्न करता त्यानुसार ती प्रोसेस तुम्हाला उद्दिष्टांपर्यंत पोहोचवते.

तुमच्या सवयी बदलणं यामध्ये तुम्ही चुकीचे नसता पण तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच वाईट सवयी का वापरता? तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा नसतो असं नाही पण तुमच्याकडे बदल करण्यासाठी कशी आणि कोणती पद्धत वापरावी याची माहिती नसते.

म्हणूनच ज्याप्रमाणे अणूच्या छोट्या-छोट्या कणांनी मॉलीक्यूल बनतो अगदी तशाच आपल्या अभ्यासाच्या सवयी, रोजच्या आयुष्यातील वागण्याच्या सवयीतील छोट्या-छोट्या बदलांनी एक छान सवय तयार होते. ॲटामिक हॅबिटसदेखील एक असा सवयींचा ब्लॉक तयार करतो ज्याचे रिझल्टस उल्लेखनीय असतात.

आपल्या वागण्याचे तीन स्तर, पातळी किंवा लेयर्स असतात. पहिला स्तर : बदलानंतर येणारे आऊटकम्स अर्थात रिझल्ट उदा. रोज सकाळी उठून १/२ तास पाठांतर करणं, रोज २० मिनिटे वाचन करणं, एखाद्या कलेचा सराव करणं, रोज एक तास खेळणं, आठवड्यातून एकदा आजीआजोबांना फोन करणं, आठवड्यातून एकदा खोली किंवा कपाट आवरणं. दुसरा स्तर : हा प्रोसेस अर्थात प्रक्रियेचा. तुम्ही प्रक्रिया कशी बदलता, प्रत्यक्षात काय करता? अभ्यास उत्तम व्हावा म्हणून नेमकं काय करता? तिसरा स्तर : स्वतःची ओळख बदलणं. तुम्ही कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवता? तुम्ही जगाकडे, इतरांकडे, शिक्षकांकडे, मित्रांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता आणि स्वतःकडे कोणत्या दृष्टीने पाहता? जेव्हा तुम्ही स्वतः च्या मनाला सांगता की मला अभ्यासू, आज्ञाधारक मुलगा, उत्कृष्ट नट, वक्ता खेळाडू बनायचं आहे. तेव्हा ती तुमची ओळख बनू लागते. हा मुलगा सूत्रसंचालक, कॅप्टन, कोडर, लेखक, गायक, फुटबॉल प्लेअर आहे आणि तुम्हीही त्याच्या सरावाच्या सिस्टीममधून जाताना स्वतःला सांगायचे आहे की मी अभ्यासू मुलगा आहे, क्रिकेट प्लेअर, कवि इत्यादी. Cue+Craving+Response+ Reward एखादी चांगली सवय लावण्याची गुरुकिल्ली म्हणजे समोरून मिळणारा अभिप्राय. कारण त्यातून सतत सुधारणा होत असते. उदा. Cue : फोन वाजला. Craving - मनात इच्छा निर्माण झाली की कोणाचा मेसेज आला ते पाहावं. Response : फोन हातात घेतला. Reward - कोणी मेसेज केला हा प्रॉब्लेम सुटला. यामुळे काय झालं? १. सुचनेमुळे अभ्यासातून लक्ष विचलित झालं. २. Craving मुळे मनाचं फस्ट्रेशन वाढलं. ३. Response : मुळे सोशल मीडिया पाहिला. ४. Reward निराशा दूर केल्याचं समाधान मिळालं. म्हणून पालकांनो विद्यार्थ्यांना आणि तुम्हाला स्वतःलाही या प्रक्रियेनुसार जर आपल्या मनाला या पद्धतीचं प्रोग्रॅमिंग केलं तर चांगल्या सवयी लावणं नक्कीच शक्य होईल.

Comments
Add Comment