Sunday, August 24, 2025

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. यातच सणासुदीचे दिवस आले की डाळ, हरभरा, साखर, मसाले आणि भाजीपाला यांना अधिक मागणी असते; परंतु मैदा, हरभरा डाळ व तूर डाळ यांच भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, खाद्यतेल, डाळ, साखर, मैदा आणि रव्याच्या दरातही तब्बल १०० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे घरखर्चाचा तोल बिघडात असून, ऐन सम्णासुदीच्या काळात महागाईचा फन्टका बसणार आहे.

सणांच्या दिवसांत मैदा, रवा आणि गोडधोडासाठी लागणाऱ्या तर साहित्याची मागणी वाढते. या मागणीचा थेट परिणाम दरवाढीवर झाला आहे, विशेषतः गोडधोड आणि पंचपक्वान्नांची रेलचेल असलेल्या सणासुदीच्या काळात साहित्याचे वाढलेले भाव घरखर्चावर ताण आणत आहेत. कृतीचा भाग सण हे संस्कृतीचा भाग असल्याने हवे नकोतेही खर्च करावे लागतात आणि त्यामुळे उत्पन्न खर्चातील समतोल बिघडतो.

सामान्य कुटुंबांची डाळ शिजेनाशी झाली आहे. सणावारांच्या तोंडावर वाहलेल्या मागणीमुळे हरभरा, तूर आणि मसूर डाळीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, रेशनमधून मिळणाऱ्या डाळ, साखर, रचा, तेल या 'आनंदाच्या शिधा'ने सामान्यांना दिलासा मिळत होता. मात्र, आता तो शिधा बंद झाल्याने नागरिकांना मोकळ्या कळ्या बाजारपेठेतूनच वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे महागाईची झळ यंदा सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात जाणवत आहे.

हरभरा, बेसनसह अनेक गोष्टी महागणार

गौरी-गणपती, नवरात्र आणि दिवाळीपर्यंत हरभरा व बेसन डाळीला मोठी मागणी राहणार असून त्याचा परिणाम भावावर होणार आहे. महागाईची झळ थेट सर्वसामान्याच्या स्वयंपाकघरात जाणवत आहे.

Comments
Add Comment