अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. बोगस लाभार्थी यांच्या विरोधात राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आल्याची माहिती आता समोर आली आहे.


पुणे- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांच्या विरोधात सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.


उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी मिळून आले आहेत. सरकारने राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये तब्बल २६ लाख ३४ हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत. हे सर्व लाभार्थी प्रत्यक्षात पात्र नसतानाही दरमहा १५०० रुपयांचा निधी घेत होते.


त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, यावर तोडगा म्हणून राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थ्यांची पुन्हा एकदा ई-केवायसीद्वारे पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी आहेत. यावर आज पुण्यात अजितदादांना विचारले असता त्यांनी थेट भूमिका न जाहीर करता, "...मग योजना बंद करू का?" अशी प्रतिक्रिया दिली.


राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ४ हजार बोगस लाभार्थी आढळले. ठाण्यात १ लाख २५ हजार ३००, अहिल्यानगरमध्ये १ लाख २५ हजार ७५६, नाशिकमध्ये १ लाख ८६ हजार ८००, छत्रपती संभाजीनगरमध्ये १ लाख ४ हजार ७००, कोल्हापूरमध्ये १ लाख १४००, मुंबई उपनगरात १ लाख १३ हजार, नागपुरात ९५ हजार ५००, बीडमध्ये ७१ हजार, लातूरमध्ये ६९ हजार, सोलापूरमध्ये १ लाख ४ हजार, साताऱ्यात ८६ हजार, सांगलीत ९० हजार, पालघरमध्ये ७२ हजार, नांदेडमध्ये ९२ हजार, जालन्यात ७३ हजार, धुळ्यात ७५ हजार तर अमरावतीत ६१ हजार बोगस लाभार्थी उघडकीस आले.


Comments
Add Comment

Pandharpur Crime : धक्कादायक! रेल्वे रुळांजवळ मृतदेह, तुटलेला पाय घराच्या दरवाज्यात टांगलेला अवस्थेत

पंढरपूर पोलिसांसमोर गूढ वाढले पंढरपूर : धावत्या रेल्वेची धडक बसून 24 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू  (Railway Accident Death)

Jalgaon : आरपीएफच्या सहाय्यक फौजदाराचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, अमळनेर रेल्वे स्थानकात खळबळ

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर रेल्वे स्थानकावर (Amalner Railway Station) सोमवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे

Drinking Water Policy : ग्रामीण भागात शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी नवे धोरण; दरमहा 150 ते 400 रुपये पाणीपट्टी आकारणार

मुंबई : ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ, निर्जंतुक आणि शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची वाटचाल ठप्प! महाराष्ट्रात आणखी काही दिवस उकाड्याचा तडाखा; मुंबईकरांना पावसासाठी करावी लागणार प्रतीक्षा

मुंबई : राज्यभरात पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी निराशाजनक बातमी आहे. नैऋत्य मोसमी पावसाची

Pune Fake Suicide : कोट्यावधींच्या कर्जातून सुटण्यासाठी हिरे व्यापाऱ्याचा मृत्यूचा बनाव; दोन चपलांनी फोडले बिंग

Pune Fake Suicide : पुणे : तब्

Suicide News: वसई येथील धक्कादायक घटना, पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

मुंबई : राज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना समोर आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वसई येथे एका पोलीस