Sunday, August 24, 2025

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे कठीण झाले आहे. अनेक ग्राहकांनी कॉल ड्रॉप, सिग्नल समस्या आणि नेटवर्क पूर्णपणे बंद पडल्याच्या तक्रारी केल्या. एका आठवड्यात एअरटेलच्या सेवा बंद होण्याची ही दुसरी वेळ आहे.

आउटेज ट्रॅकर डाउनडिटेक्टरनुसार, कनेक्टिव्हिटी समस्या सकाळी १०.४४ पासून सुरू झाल्या आहेत. दुपारी १२.१४ वाजता तक्रारी शिगेला पोहोचल्या. हजारो एअरटेल ग्राहकांनी कॉल करू शकत नाही, इंटरनेट वापरता येत नाही अशा तक्रारी केल्या.

आठवड्याभरात दुसऱ्यांदा एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले. याआधी १९ ऑगस्ट रोजी एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले होते. आधी १९ ऑगस्ट आणि आता २४ ऑगस्ट रोजी एअरटेलचे ग्राहक नेटवर्क कोलमडल्यामुळे त्रस्त झाले.

Comments
Add Comment