Sunday, August 24, 2025

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही येत आहेत. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गाजत असताना उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे नुकतीच एक घटना घडली आहे. येथील २१ वर्षीय विद्यार्थीनीच्या भटक्या कुत्र्यांनी गालाचा चावा घेतला आहे. बीबीएच्या कोर्सला शिकणारी विद्यार्थीनी महाविद्यालयातून घरी येत असताना तिच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.

या हल्ल्यात सदर विद्यार्थी गंभीर जखमी झाली असून डॉक्टरांनी तिच्या गालावर १७ टाके घातले आहेत. ही घटना २० ऑगस्ट रोजी कानपूरच्या शान नगर परिसरात घडली. या परिसरात भटके कुत्रे आणि माकडांमध्ये संघर्ष सुरू होता. या दरम्यान तिथून जात असलेल्या वैष्णवी साहू नाम विद्यार्थीनीवर अचानक तीन कुत्र्यांनी हल्ला केला.

भटक्या कुत्र्यांनी वैष्णवीवर इतक्या जोरात जबर हल्ला केला की, ती जमिनीवर पडली. त्यानंतर कुत्र्यांनी तिचा चेहरा विद्रूप केला. तिचा उजवा गाल अशरक्षः फाटला. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी कुत्र्यांनी चावे घेतले. तिने कुत्र्यांच्या तावडीतून निसटून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांनी तिचा पाठलाग करून पुन्हा हल्ला केला.

Comments
Add Comment