Saturday, August 23, 2025

मुंबईतील धक्कादायक घटना, एसी कोचच्या टॉयलेटमध्ये पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह

मुंबईतील धक्कादायक घटना, एसी कोचच्या टॉयलेटमध्ये पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह

मुंबई : मुंबई - कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोचच्या टॉयलेटमध्ये पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला. ही घटना मुंबईत घडली. लोकमान्य टिळक टर्मिनस - कुशी नगर एक्सप्रेस २२५३७ या गाडीच्या एसी कोच बी २ च्या टॉयलेटमध्ये पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला.

प्रवाशांनी हा मृतदेह बघताच तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आणि रुग्णालयात पाठवून दिला.

प्राथमिक तपासातून हाती आलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांच्या मुलाचे त्याच्या मावस भावाने अपहरण केले होते. याच मुलाचा मृतदेह रेल्वेच्या एसी कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. अपहरण आणि हत्येच्या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे. कॅमेरा फूटेजच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment