
जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा तालुक्यातून अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी अबिद हुसेन शेख जलील (३८, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील एका गावातील काही पीडित विद्यार्थिनीसह काही विद्यार्थी शिक्षणासाठी शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे स्कूल बसने ये-जा करतात. आरोपी आबिद हा देखील याच शाळेत स्कूल बस चालक म्हणून काम करतो. आरोपीनं पीडित मुलीला एका शेतात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबर २०२५ ...
खरं तर दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पीडितेचा जबाब घेतला असता हा केवळ विनयभंग नव्हे तर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण असल्याचं समोर आलं.
पुरवणी जबाबात पीडितेनं बस चालकाने आपल्यावर बलात्कार केल्याचा जबाब दिला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित ३८ वर्षीय बस चालक अबिद हुसेन शेख जलील याला अटक केली. त्याच्याविरुद्ध बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.