आता जिओ फायनांशियल सर्व्हिसेसकडून शेअर होल्डरसाठी इ वोटिंगचा पर्याय! निर्णयप्रक्रियेत होणार बळकट लोकशाहीकरण !

मोहित सोमण: जिओ फायनांशियल सर्व्हिसेसने आपल्या शेअर होल्डर गुंतवणूकदारांसाठी ई व्होटिंग प्रोसेसची घोषणा केली आहे. जिओ फायनांशियल सर्व्हिसेस ही आघाडीची वित्तीय कंपनी भारतभरात कार्यरत आहे. आपल्या भागभांडवलाप्रमाणेच गुंतवणूक दारांना आपले मत मांडण्याचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी जिओ फायनांशियल सर्व्हिसेसने हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात कंपनीची वार्षिक सर्वसाधारण बैठक (AGM) होणार आहे. ई व्होटिंग प्रकिया २ ३ ऑगस्टला दुपारी १ वाजता कंपनीने जाहीर केली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअरहोल्डर निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहेत.


याविषयी नेमक्या शब्दात जिओ फायनांशियल सर्व्हिसेसने म्हटले आहे की,'कंपनीमध्ये भागधारक असल्याने तुम्हाला महत्त्वाच्या बाबींबाबत निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते. प्रचलित नियमांनुसार, कंपन्यांना महत्त्वाच्या ठरावांवर भागधारकांची संम ती घ्यावी लागते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान केल्याने तुम्हाला बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित न राहता निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येते. तुम्ही जिओ फायनांशियल सर्व्हिसेसमध्ये शेअर्स धारण करत असल्याने, तुम्हाला शेअरधारकांची मंजुरी आवश्यक असलेल्या ठरावांवर मतदान करण्याचा अधिकार आहे.'



सीडीएसएल (Central Depository Services Limited) या डिपॉझिटरी व्यासपीठाच्या माध्यमातून हे ई मतदान गुंतवणूकदारांना करता येईल. कंपनीने नेमकी सर्वसाधारण बैठकीची तारीख २८ ऑगस्ट निश्चित केली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत ही बैठक होणार असून या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय व विधेयके पास केली जाण्याची शक्यता आहे. महत्वाच्या मुद्यावर इ वोटिंग दुपारी १ वाजता होईल व ५ वाजता इ वोटिंगची सांगता होणार आहे. गुंतवणूकदारांना आवश्यक नियमाची पूर्तता करून हे वोटिंग करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक डी मॅट खात्यांची पडताळणी गुंतवणूकदारांनी करणे आवश्यक आहे. काही प्रश्न असल्यास गुंतवणूकदार सीडीएसएलच्या मदत कक्षावर (Help Desk) संपर्क करु शकतात.


मतदान करण्यासाठी आपली डी मॅट खात्याची माहिती सीडीएसएल इ वोटिंग पोर्टलवर जाऊन भरावी लागेल. त्यासाठी भागभांडवलधारकांनी आपल्या खात्यातून लॉग इन करणे बंधनकारक असेल.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

नवी दिल्ली लाल किल्ला कार स्फोट प्रकरणात तपासात नवे धक्कादायक खुलासे!

नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी घडलेल्या कार स्फोट प्रकरणात तपासाला मोठा वळण आले आहे.

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

दिल्लीत जैश-ए-मोहम्मदकडून हवालामार्गे आले २० लाख ? तपासकर्त्यांसमोर नवीन कोडे

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासात गुप्तचर यंत्रणांना डॉ. उमर, डॉ.