Sunday, October 26, 2025
Happy Diwali

मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईत येणार, नाशिक, जालनामध्ये बैठकांचं सत्र

मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईत येणार, नाशिक, जालनामध्ये बैठकांचं सत्र

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देत 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा निघणार काढणार असल्याचा इशारा दिला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन येणार आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईत येणार असून मराठा समाजाच्या नागरिकांना लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. पण मुंबई येत्या 27 ऑगस्ट पासून गणेशोत्सव सुरु होणार आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांची मनधरणीचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत.

विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील तयारी आणि बैठका विविध ठिकाणी सुरु आहेत. तर दुसरीकडॆ मनोज जरांगे यांचं मुंबईतील आंदोलन सुरु होण्यापूर्वीच राज्य सरकार सक्रीय झाल्याचं बघायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरती तब्बल दीड ते दोन तास खलबते चालल्याची माहिती समोर आली .

दुसरीकडे, मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेत राहणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या आधी राज्य सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे संभाव्य परिस्थिती लक्ष्यात घेता या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग आलाय.

Comments
Add Comment