
मोहित सोमण: युएस फेडरल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांनी जॅक्सन होल, वायोमिन येथे फेडचा वार्षिक कॉन्क्लेव्ह येथील आपल्या अभिभाषणात दर कपातीचे संकेत दिले आहेत. आमचे आगामी धोरण 'पुनर्रचित ' असू शकते असे म्हणत त्यांनी व्याज दरात कपातीचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे आज युएस शेअर बाजारात मोठी रॅली झाली आहे. युएस शेअर बाजारातील डाऊ जोन्स तर ९१८ अंकाने व एस अँड पी ५०० १.६% तर नासडाक कंपोझिट २% वाढला आहे. तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) शेअर्समध्ये महाप्र चंड वाढ झाली आहे. ज्यामध्ये अमेरिकन बाजारातील एनव्हिडिया (१.०३%), अल्फाबेट (२.००%), अमेझॉन (२.००%) यांसारख्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. जमलेल्या श्रोत्यांना संबोधित करताना जेरोमी पॉवेल यांनी अनेक आर्थिक मुद्यावर हात घालत फे ड बँकेची भूमिका यावेळी स्पष्ट केली आहे. पॉवेल यांच्या मते, महागाई कमी करण्यासाठी आणि एकूण मागणी आणि पुरवठ्यामध्ये शाश्वत संतुलन राखण्यासाठी संघीय दरांमध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळाची स्थिती आणि प्रतिबंधात्मक धोरणात्मक भूमिका योग्य होती.
त्यांनी आपल्या अभिभाषणात म्हटले आहे की,' खालच्या श्रेणीतील बेरोजगारीत वाढ होत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून फेड दर स्थिर आहेत.' असे म्हटले याशिवाय त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ मुद्यावर मत व्यक्त करताना म्हटले आहे की,' हा टॅरिफ वाढी नंतर महागाईचा नकारात्मक परिणाम अल्प काळासाठीच राहिल'.तसेच जेरोमी पॉवेल यांनी 'हे धोरण मर्यादित क्षेत्रात आहे. बेसलाईन आऊटलूक हा कायम असू शकतो. त्यामुळे आगामी काळातील जोखीमकडे वळण्यासाठी आम्ही धोरणात्मक पुनर्मांडणी करू 'असे जेरोमी पॉवेल यांनी म्हटले आहे. याशिवाय त्यांनी लेबर मार्केटमध्ये झालेल्या किरकोळ वाढीवर चिंता व्यक्त केली होती. सुत्रांच्या माहितीनुसार, १६ ते १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत जेरोमी पॉवेल दरकपातीचा निर्णय घेऊ शकतात.
मात्र यावेळी त्यांनी कामगार आकडेवारीवर चिंताही व्यक्त केली आहे.'लेबर मार्केटमध्ये मागणी व पुरवठा यांचाही विचार करुन संतुलन राखणे आवश्यक असल्याचा आजही पुनरूच्चार केला आहे. या संतुलनात बदल झाल्यास त्याचा निश्चित परिणाम लोकांच्या रो जगारवर पडू शकतो 'अशी भीतीही यावेळी व्यक्त केली होती.त्याच वेळी, पॉवेलने हे मान्य केले की टॅरिफमुळे अधिक टिकाऊ चलनवाढीचा ट्रेंड निर्माण होऊ शकतो, हा धोका फेडने काळजीपूर्वक मोजला पाहिजे.'बेरोजगारी दराची स्थिरता आणि इतर कामगा र बाजार उपायांमुळे आम्हाला बदलांचा विचार करताना काळजीपूर्वक पुढे जाण्याची परवानगी मिळते' असे त्यांनी नमूद केले. वायोमिंगमधील जॅक्सन होल येथे झालेल्या मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक परिषदेत,भाषणात पॉवेल म्हणाले की,'मूलभूत दृष्टिकोन आणि बद लत्या जोखमींच्या संतुलनामुळे आपल्या धोरणात्मक भूमिकेत बदल करणे आवश्यक असू शकते.' पॉवेल पुढे म्हणाले की, फेडच्या पूर्ण रोजगार आणि स्थिर किमतींच्या दुहेरी आदेशात जोखमींचे संतुलन बदलत असल्याचे दिसून येते त्यांनी कर, व्यापार आणि इमि ग्रेशन धोरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल' झाल्याचे यावेळी नमूद केले आहे.
जेरोमी पॉवेल यांच्या संकेताचा शेअर बाजारावर परिणाम!
जेरोमी पॉवेल यांच्या भाषणानंतर युएस बाजारात मोठा फायदा गुंतवणूकदारांना झाला. तब्बल १ ते २% एकूण रॅली बाजारात झाल्याने गुंतवणूकदारांनी घसघशीत नफा कमावला आहे. गुगल कंपनीच्या शेअरसह आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाली. काल अखेरीस तिन्ही युएस शैअर बाजारात वाढ झाली आहे. डाऊ जोन्स (१.८९%), एस अँड पी ५०० (१.५२%), नासडाक (१.८८%) बाजारात वाढ झाली आहे. प्रभावी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उत्पादनांमुळे, एनव्हीडियाच्या शेअर्सच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे अलिकडच्या वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्र आणि एकूण बाजारपेठ दोन्हींना चालना मिळाली आहे. गेल्या महिन्यात, एनव्हीडिया $४ ट्रिलियन बाजारमूल्याचा टप्पा गाठणारी पहिली कंपनी बनली होती.
व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाची कपात?
युएस बाजारातील अनेक तज्ञांनी व्याजदरात २५ बीपीएसने कपात होऊ शकते असे संकेत दिले आहेत. याचविषयी, नेव्ही फेडरलच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ हीदर लाँग यांनी मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते,'फेडचे अध्यक्ष पॉवेल सप्टेंबरमध्ये २५ बेसिस पॉइंट्सच्या दर कपातीचे संकेत देत आहेत *खूप शक्यता*. त्यांचे जॅक्सन होल भाषण फेड जितके स्पष्ट आहे तितकेच स्पष्ट आहे.' असे ट्विट त्यांनी केले आहे.तसेच त्या पुढे म्हणाल्या आहेत की,' पण...ते त्यानंतर आणखी दर कपात करू नका असे देखील संकेत देत आहेत. फेड नेते अजूनही टॅरिफ-प्रेरित महागाईचे काय होते ते पाहत असतील.' त्यामुळे या वक्तव्याचा सोमवारी भारतीय शेअर बाजारावर संभाव्य परिणाम होऊ शकतो.