
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद ठेवले आहे. ही बंदी खासगी, व्यावसायिक तसेच लष्करी उड्डाणांवर देखील लागू आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ हिंदू नागरिकांची जिहादी दहशतवाद्यांनी टार्गेट किलींग केल्यानंतर , भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद केले. ही बंदी सुरुवातीला २४ मेपर्यंत होती, मात्र नंतर ती महिन्यागणिक वाढवण्यात आली आहे. भारत सरकारने नव्याने जारी केलेल्या नोटीस टू एअरमॅन (एनओटीएएम) अनुसार, पाकिस्तानी नोंदणीकृत किंवा त्यांच्या एअरलाइन्स/ऑपरेटरद्वारे चालवली जाणारी कोणतीही उड्डाणे २३ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपासून २४ सप्टेंबर सकाळी ५.३० वाजेपर्यंत भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करू शकणार नाहीत.

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे. मात्र, शुक्रवारी रात्री साडेबाराच्या ...
दुसऱ्या बाजूला, पाकिस्ताननेही २० ऑगस्ट रोजी एनओटीएएम जारी करून भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही बाह्य मध्यस्थी स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या हवाई क्षेत्र बंदीमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.