Saturday, August 23, 2025

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. काही युझर्सना अचानक टिकटॉकची वेबसाईट ॲक्सेस करता येऊ लागल्याने सोशल मीडियावर उत्साहाचे वातावरण आणि प्रश्नांचे मोहोळ उठले आहे.

भारत सरकारने २०२० मध्ये टिकटॉकसह ५९ चिनी ॲप्सवर बंदी घालताना डेटा प्रायव्हसी आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. सरकारने घातलेली ही बंदी अजूनही कायम आहे.

जोपर्यंत सरकारकडून हिरवा कंदील मिळत नाही, तोपर्यंत टिकटॉकचे पुनरागमन अशक्य आहे. कंपनीकडून किंवा भारत सरकारकडून यावर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. वेबसाईटचा मर्यादित ॲक्सेस हा आशेचा किरण असला तरी, तो पुनरागमनाची हमी देत नाही.

त्यामुळे, जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत या केवळ चर्चाच राहतील. टिकटॉकच्या चाहत्यांना आणि कंटेंट क्रिएटर्सना यासाठी अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा