
मोहित सोमण: सोन्याच्या व चांदीच्या दरात शनिवारी त्सुनामी आली आहे. जागतिक पातळीवरील सोन्याच्या स्पॉट मागणीत वाढ झाल्याने सोने महागले आहे. युएस फेडरल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांच्याकडून दरकपातीचा इशारा मिळताच युएस शे अर बाजारात मोठी वाढ झाली होती. त्याचाच उत्तरार्ध म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनीही आगामी काळात नवे टॅरिफची घोषणा केल्याने गुंतवणूकदारांना सावधगिरी बाळगली आहे. कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज मात्र सोन्यात तुफान वाढ झाली आहे.'गुडरिटर्न्स' सं केतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०९ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८१.४० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १०१६२ रूपये, २२ कॅरेटसाठी ९३१५ रूपये, १८ कॅरेटसाठी ७६२१ रूपयांवर पोहोचले आहे. ज्यामुळे मध्यमवर्गीय नाही तर उच्च मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर सोने पोहोचले आहे.संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १०९० रूपयांनी, २२ कॅरे ट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १००० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ८१४ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १०१६२० रूपये, २२ कॅरेटसाठी ९३१५० रूपये, १८ कॅरेटसाठी ७६२१४ रुपयांवर पोहोचले आहेत.
जागतिक पातळीवरील सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात आज संध्याकाळपर्यंत १.०९% प्रचंड वाढ झाली आहे. जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत १% वाढ झाल्याने सोन्याची दरपातळी प्रति डॉलर ३३७२.११ औंसवर गेली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मध्ये संध्याकाळपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात ०.९६% इतकी मोठी वाढ झाली आहे त्यामुळे सोन्याची दरपातळी १००३९१ रूपयांवर पोहोचली आहे. मुंबई सह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम दर आज २४ कॅरेटसाठी १०१६२ रूपये, २२ कॅरेटसाठी ९३१५ रूपये, १८ कॅरेटसाठी ७७०५ रूपयांवर पोहोचली आहे.
याशिवाय भारतात, सोन्याच्या किमतीत झालेली तीव्र वाढ ही येणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी सोने खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांसाठी ही दुःखद बातमी आहे. वाढत्या भू-राजकीय तणाव, जागतिक अनिश्चितता आणि व्यापार संघर्षांमुळे गेल्या काही महिन्यांत सोन्या च्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तरी काल युएस फेड व्याजदरात कपातीची शक्यता वर्तवली गेल्याने सकारात्मकता युएस बाजारात कायम होती. शुक्रवारी सत्रादरम्यान डॉलर निर्देशांक सुमारे ०.१५ टक्क्यांनी वाढला होता ज्याचा फटका काल सोन्यात बसला आज मात्र परिस्थिती बदलली आहे. डॉलर काल दोन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार करत होता. यामुळे इतर चलनांमध्ये सोने महाग झाले आणि त्याची मागणी कमी झाली आहे. आजही रूपयात मोठी घसरण झाल्याने सोन्याला आधारभूत पातळी गा ठता आलेली नाही आणि भारतीय सराफा बाजारात सोने महागले आहे.
चांदीतही त्सुनामी !
चांदीच्या दरात सलग दुसऱ्यांदा मोठी रॅली झाली आहे. ही वाढ प्रचंड मानली जात असून जगभरातील परिस्थितीचा फटका चांदीच्या निर्देशांकात बसला आहे. सोन्यासारख्या धातुबरोबर लोकांनी भविष्यातील तरतूद म्हणून चांदीत गुंतवणूक करणे वाढल्याने बाजा रातील मागणी वाढली. दुसरीकडे औद्योगिक विश्वातील ईव्ही, तसेच इतर औद्योगिक वापरासाठी वाढलेल्या स्पॉट मागणीमुळे, व ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धमकीमुळे चांदी आणखी महागली आहे.
'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात २ रुपयांनी वाढ झाली असून प्रति किलो दरात २००० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसात चांदीत भारतीय बाजारात ४ हजार रुपयांची वाढ झाली आहे. भारतातील मुंबईसह प्रमुख श हरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर १२० रूपये, प्रति किलोसाठी १३०००० रुपयांवर पोहोचले आहेत. जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.५६% इतकी महाकाय वाढ झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स मध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत काही बदलला नाही त्यामुळे दरपातळी ११६२३४ रूपये प्रति किलोवर कायम आहे.