Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल सुरू करण्यात आला. ज्यावर महाराष्ट्रातील राजकारणात देखील विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू झाल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतचोरीच्या आरोपावरून आपली प्रतिक्रिया दिली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर आतापर्यंत मौन बाळगले होते.  मात्र, आता विरोधकांकडून सुरू असलेल्या या आरोपांना अजित पवार यांनी देखील जोरदार हल्लाबोल चढवला आहे. विरोधकांकडे काही मुद्देच नाहीत. मत चोरी वगैरे हे फेक नरेटिव्ह आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.



काय म्हणाले अजित पवार?


विरोधकांकडे काही मुद्देच नाहीत. मत चोरी वगैरे हे फेक नरेटिव्ह आहेत. मध्यंतरी काँग्रेसकडे काही राज्यांची सत्ता गेली, त्यावेळी मतचोरी, ईव्हीएम त्यांना दिसलं नाही. सत्ता गेली की मग ईव्हीएम आणि मत चोरीचे मुद्दे समोर आणले जातात, यात काहीही तथ्य नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

‘द केरळ स्टोरी’ फेम अदाला मोठा धक्का; लाडक्या आजीचे निधन, महिनाभर सुरू होते उपचार

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखातून जात आहे. ‘द केरळ स्टोरी’मुळे

स्मृती–पलाशच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा; संगीत समारंभाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सांगली : भारतीय क्रिकेटमधील स्टार खेळाडू स्मृती मंधाना आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक व चित्रपट निर्माते पलाश

बुधवारी मुख्यमंत्री पेणमध्ये; फोडणार प्रचाराचा नारळ

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध ही पुन्हा सत्ता स्थापनेची नांदी  स्वप्नील पाटील पेण : राज्यातील नगर परिषदेच्या

शिवसेना व रिपब्लिकन सेनेची युती

रिपब्लिकन सेनेचा ११ वा वर्धापन दिन ठाणे : ''२५ वर्षांपूर्वी ठाण्यात आनंद दिघे यांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची

अभिनेत्री श्रद्धा कपूर शूटिंगदरम्यान जखमी

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,

‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या