
मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले, त्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल सुरू करण्यात आला. ज्यावर महाराष्ट्रातील राजकारणात देखील विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू झाल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतचोरीच्या आरोपावरून आपली प्रतिक्रिया दिली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर आतापर्यंत मौन बाळगले होते. मात्र, आता विरोधकांकडून सुरू असलेल्या या आरोपांना अजित पवार यांनी देखील जोरदार हल्लाबोल चढवला आहे. विरोधकांकडे काही मुद्देच नाहीत. मत चोरी वगैरे हे फेक नरेटिव्ह आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
विरोधकांकडे काही मुद्देच नाहीत. मत चोरी वगैरे हे फेक नरेटिव्ह आहेत. मध्यंतरी काँग्रेसकडे काही राज्यांची सत्ता गेली, त्यावेळी मतचोरी, ईव्हीएम त्यांना दिसलं नाही. सत्ता गेली की मग ईव्हीएम आणि मत चोरीचे मुद्दे समोर आणले जातात, यात काहीही तथ्य नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.