विश्वास नांगरे पाटील यांनी शेअर केले शालेय प्रगतीपुस्तक, गुण पाहून व्हाल अचंबित

मुंबई: विश्वास नांगरे पाटील यांनी शालेय जीवनातील इयता आठवीचे प्रगतीपुस्तक सोशल मिडियावर शेअर केले आहे. वार्षिक परीक्षेत त्यांना मिळालेले गुण पाहता ते किती हुशार विद्यार्थी होते हे लक्षात येईल.


आज विश्वास नांगरे पाटील हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचलित आहे. ते भारतीय पोलीस सेवेतील एक अत्यंत कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि लोकप्रिय असे अधिकारी आहेत. त्यांचे अनेक प्रेरणादायी व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक तरुणांनी MPSC आणि UPSC सारख्या कठीण परीक्षांमध्ये यश मिळवून शासकीय सेवेत प्रवेश केला आहे.


पण एक लक्षवेधी बाब म्हणजे, विश्वास नांगरे पाटील शाळेत असतानाही खूप हुशार होते. शालेय परीक्षेत त्यांचा नेहमीच पहिला क्रमांक यायचा. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर इयत्ता आठवीचे प्रगतीपुस्तक शेअर केले आहे. ज्यामधील त्यांनी मिळवलेले गुण पाहिले तर ते आज इतके यशस्वी कसे झाले? याची प्रचिती येईल.



विश्वास नांगरे पाटील यांची पोस्ट व्हायरल




विश्वास नांगरे पाटील यांनी आपले शालेय प्रगतीपुस्तक शेअर करताना म्हंटले आहे,  "कोकरूडच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतून शिराळ्याला सातवी इयत्तेत न्यू इंग्लिश स्कुलमध्ये प्रवेश घेतला. मन रुळत नव्हते. सारखं गावाला जायची ओढ लागायची. कोकरूडला बारा महिने वाहत्या वारणा नदीत मनसोक्त डुंबायची सवय होती. शिराळ्याच्या मोरणा माई मध्ये फक्त पावसाळ्यातच वाहत पाणी असायचं. कोकरूडचे जिप शाळेतले विजार किंवा धोतर सदऱ्यातले मास्तर प्रेमळ होते. अभ्यासापेक्षा व्यायामावर भर असायचा. शासकीय पोषण आहार योजनेतले दूध मनसोक्त प्यायला मिळायचे. नव्या शाळेतले शिक्षक इस्त्री केलेले शर्ट पॅन्ट घालून यायचे. शाळेत भलती शिस्त होती. सगळे वर्ग वेळेवर व्हायचे. मुख्याध्यापक दिगवडेकर सरांचा आवाज आला तर सगळीकडे चिडीचूप व्हायची. लवटे सरांच्या छडीने हात फुरफुर सुजायचा. छडी लागे छमछम विद्या येई घमघम. जोर जबरदस्तीने का होईना, हळूहळू अभ्यासाची गोडी लागली. स्पर्धा आवडायला लागली. दर महिन्याला चाचणी परीक्षा व्हायची. प्रत्येक परीक्षेची पायरी जिद्दीने चढायला सुरु केली. कष्टाला यशाची जोड मिळाली आणि मला सरस्वती माता प्रसन्न झाली. शास्त्र गणितात सूर गवसला. भाषा अध्ययनाचा नाद लागला. आणि दिव्य म्हणजे, आठव्या इयत्तेत चार तुकड्यामध्ये मिळून पहिला क्रमांक आला. मग मात्र कधी वळून मागे पाहिले नाही. "


त्यांनी इयत्ता आठवीत वार्षिक परीक्षेत ७५० पैकी ६६९ गुण मिळवलेले दिसून येतात. ग्रामीण शाळेत शिकलेले विश्वास नांगरे पाटील हे लहानपणापासून किती गुणवंत आणि हुशार होते हे यामधून दिसून येते.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन