युएस आयटी कंपनी Kyndryl कडून अब्जो डॉलरची गुंतवणूक करणार पीएम मोदींचीही घेतली भेट

कंपनीकडून २.२५ अब्ज बिलियन डॉलर गुंतवणूकीची घोषणा

प्रतिनिधी: युएसस्थित आयटी कंपनी केंड्रिल (Kyndryl) कंपनीने भारतात २.२५ बिलियन डॉलर्स म्हणजेच १९६०० कोटींची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत कंपनीचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्रोएटर(M artin Schroeter) यांनी गुंतवणूकीची घोषणा नवी दिल्लीत केली आहे. कंपनी पुढील तीन वर्षांत १९६०० कोटींची गुंतवणूक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) लॅबोरेटरीसह, सायबर सिक्युरिटी, तसेच डिजिटल आधुनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी भा रतात करणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे,पुढील तीन वर्षांत २.२५ अब्ज डॉलर्सच्या या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, Kyndryl भविष्यासाठी तयार असलेल्या प्रतिभेच्या विकासावर आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात कंपनीचा प्र भाव वाढवण्यासाठी भारतात AI लॅब स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. याशिवाय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्रोएटर यांनी टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर इकोसिस्टीस मजबूत करण्यासाठी आम्ही हे धोरणात्मक पाऊल उचलण्याचा निर्णय घेत ला आहे.

'मार्टिन श्रोएटर यांच्यासोबतची ही खरोखरच समृद्ध करणारी भेट होती. आपल्या देशातील विपुल संधींचा शोध घेण्यासाठी आणि नवोन्मेष आणि उत्कृष्टतेसाठी आपल्या प्रतिभावान तरुणांसोबत सहयोग करण्यासाठी भारत जागतिक भागीदारांचे हार्दिक स्वागत क रतो. एकत्रितपणे, आपण सर्वजण असे उपाय तयार करू शकतो जे केवळ भारतालाच फायदेशीर ठरणार नाहीत तर जागतिक प्रगतीलाही हातभार लावतील' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीनंतर उद्गार काढले आहेत.याशिवाय कंपनीने असेही म्हटले आहे की,'केंड्रिलच्या नियोजित वचनबद्धतेमध्ये बेंगळुरूमध्ये एआय इनोव्हेशन लॅबची स्थापना करणे, एआयवर भारत सरकारशी त्यांचे संबंध वाढवणे, आयटी प्रतिभा विकसित करणे आणि सुमारे २००००० नागरिकांना डिजिटल प्रशिक्षण देणे यांचा समावेश आहे.'

कंपनीने भारतीय बाजारात आपली गुंतवणूक वाढवत असताना ए आय तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत तंत्रज्ञानपूरक इकोसिस्टीम उभारण्यासाठी पाऊले उचलली आहेत. याविषयी बोलताना,' या वचनबद्धतेसह, कंपनी (Kyndryl) आमच्या ग्राहकांना त्यांच्या विवि ध परिवर्तनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि वाढीच्या पुढील युगासाठी त्यांचे कामकाज वाढविण्यास अधिक पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे,'असे कंपनीचे भारतातील अध्यक्ष लिंगराजू सावकर म्हणाले आहेत.
Comments
Add Comment

सी. पी. राधाकृष्णन झाले भारताचे १५ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींनी दिली शपथ

नवी दिल्ली : भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ घेतली. दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे

तीनवेळा घसरल्यानंतर ऑटो Stocks सकाळी जबरदस्त उसळले 'या' कारणामुळे

मोहित सोमण:निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील कामगिरी सकाळच्या सत्रात महत्वाची राहिली. याचाच एक भाग म्हणून ऑटो

इन्फोसिसचे BuyBack Share लक्ष्य पूर्ण होणार संचालक मंडळाच्या १८००० कोटींच्या मंजूरीनंतर शेअर उसळला

मोहित सोमण:सप्टेंबर महिन्यात अखेरीस इन्फोसिसने आपले लक्ष पूर्ण केले. प्रस्तावित शेअर बायबॅकला (Share Buyback) इन्फोसिस

मुंबईचा ऐतिहासिक एल्फिन्स्टन ब्रिज आज मध्यरात्रीपासून बंद; वाहतुकीचा नवा मार्ग जाहीर

मुंबई : दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवीला जोडणाऱ्या एल्फिन्स्टन ब्रिज अर्थात

टोयोटा किर्लोस्कर कडून नवरात्रीत ग्राहकांची 'दिवाळी' मिळणार जीएसटी कपातीचा फायदा

जीएसटी सवलतीसह १ लाखांपर्यंत फायदे ग्राहकांना मिळणार ! प्रतिनिधी:सणासुदीच्‍या काळामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर

सॅमसंग गॅलेक्सी F17 5G स्मार्टफोन लाँच

गुरुग्राम: भारतातील मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने आज गॅलेक्सी F17 5G लाँच करण्याची घोषणा केली आहे.