बाळासाहेबांचे विचार सोडल्याने तुम्हाला कामगारांनी नाकारले

शिवसेना उपनेते संजय निरुपम यांची उबाठावर टीका


मुंबई : सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडणारे आणि वारंवार भूमिका बदलणारे ठाकरे बंधु एकत्र आले तरी मुंबईच्या निवडणुकीत फारसा फरक पडणार नाही हे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतून दिसून आले, अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाकरे बंधु एकत्र आल्याने मुंबईचे राजकारण बदलेल असे केले जाणारे दावे या निकालाने फोल ठरले, असा टोला निरुपम यांनी यावेळी लगावला. मराठी माणसांच्या मनात बाळासाहेब ठाकरेंनंतर आता एकनाथ शिंदे यांना स्थान आहे, असे ते म्हणाले.


निरुपम पुढे म्हणाले की, बेस्ट पतपेढी निवडणुकीपूर्वी मुंबईत उबाठा आणि मनसेची युती करण्यात आली होती. मराठी मतांसाठी त्यांनी मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण केला, असा आरोप निरुपम यांनी केला. ठाकरे बंधु एकत्र आल्याने मुंबईचे राजकारण बदलेल. तसेच ठाकरे ब्रॅंडबाबत विजयाचे दावे केले जात होते.मात्र, हे दावे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत फोल ठरले. पतपेढीच्या निवडणुकीत २१ जागांपैकी एकही जागा ठाकरे बंधुंना जिंकता आले नाही. या निवडणुकीत ८३ टक्के मतदान झाले. बेस्टच्या १२ हजार मतदारांनी ठाकरे बंधुंना नाकारले, असे निरुपम म्हणाले.


मुंबईत एकच ब्रॅंड तो म्हणजे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आहेत, असे निरुपम म्हणाले. मुंबईतील मराठी माणसांच्या मनात बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्थान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच्या विचारांचे खरे वारसदार एकनाथ शिंदे आहेत, असे निरुपम म्हणाले. मुंबई सर्वांना सामावून घेणारं शहर आहे. या शहरात भाषिक वाद करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना स्पष्टपणे नाकारले जाईल, असे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतून संदेश मिळाला आहे. मुंबईत उबाठाचे आमदार आणि खासदार हे मुस्लिम मतांवर निवडून आले. त्यांच्यापासून मराठी मतदार दुरावला आहे, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५