Friday, August 22, 2025

भररस्त्यात हातात चाकू घेऊन मास्क मॅनची दहशत ! नागरिक भयभीत

भररस्त्यात हातात चाकू घेऊन मास्क मॅनची दहशत ! नागरिक भयभीत

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या समस्या वाढत आहेत . एकामागोमाग एक अशा गुन्हेगारी घटना पुण्यात घडत असतात . त्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय . पुण्यात दिवसाढवळ्या एक इसम हातात चाकू घेऊन आणि मास्क घालून फिरत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे . निगडीतील बजाज ऑटोमोबाईल समोरील एचपी पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हातात चाकू घेत हा इसम गर्दीच्या ठिकाणी फिरत होता. त्याच्या तोंडावर मास्क लावलेला होता. रस्त्यावर चाकू घेऊन फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती . या मास्क मॅनची माहिती मिळताच अगदी काही तासांच्या आत निगडी पोलिसांनी या मास्क मॅनला ताब्यात घेतले. हातात धारदार चाकू घेऊन फिरणारा मास्क मॅन हा मनोरुग्ण असून भंगार वेचक असल्याचे म्हटले जात आहे.

या व्यक्तीशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यात तो विचित्र कपड्यांमध्ये दिसत आहे. या व्यक्तीचा हेतू नक्की काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हा व्यक्ती कोणावर हल्ला करण्याच्या उद्देशाने फिरत होता का ? याचा तपास पोलिस करत आहे .

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >