Friday, August 22, 2025

सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरगुंडी सेन्सेक्स व निफ्टी 'इतक्याने' घसरला काय महत्वाचे कारण जाणून घ्या

सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरगुंडी सेन्सेक्स व निफ्टी 'इतक्याने' घसरला काय महत्वाचे कारण जाणून घ्या

मोहित सोमण: आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सलग तीन दिवसांच्या रॅली व सलग चार दिवस सकारात्मक सुरूवातीनंतर 'बुलिश' बाजार आज 'बिअरिश' बाजारात परिवर्तित झाले आहे. सेन्सेक्स ३७०.४६ व निफ्टी ११९.८० अं कांने घसरला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २९४.१२ अंकाने व बँक निफ्टी ३१९.९५ अंकाने घसरला आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१३%,०.४२% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅपमध्ये ०.०२% वाढ झाली असून स्मॉलकॅपमध्ये ०.२९% घ सरण झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात बहुतांश समभागात घसरण झाली आहे. सर्वाधिक वाढ मिडिया (०.५२%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.२६%) निर्देशांकात झाली आहे. सर्वाधिक घसरण मेटल (०.७०%), रिअल्टी (०.६७%), फायनांशियल सर्व्हिसे स २५/५० (०.५३%), खाजगी बँक (०.५८%) निर्देशांकात झाली आहे.

आज गुंतवणूकदारांचे लक्ष्य प्रामुख्याने युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का याकडे विशेषतः लागले आहे कारण युएस व परदेशी गुंतवणूकदार (FII) फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांच्या आगामी जॅक्सन होल परिसंवादावर लक्ष केंद्रित करतील. सप्टेंब रमध्ये फेड २५ बेसिस पॉइंट्सनी दर कमी करेल का यावरील संकेतांसाठी त्यांच्या भाषणावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल अशी शक्यता आहे.तज्ञांच्या मते, दर कपातीमुळे भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढू शकते. परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) २१ ऑगस्ट रोजी १२४६ कोटी रुपयांच्या इक्विटी खरेदी केल्या परंतु १.९४ लाख कोटी रुपयांच्या वार्षिक बहिर्गमनसह निव्वळ विक्रेते राहिले आहेत. याउलट घरगुती गुंतवणूकदारांनी (DII)२५४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, ज्यामुळे कालमर्यादेत मजबूत गुंतवणूक झाली. निफ्टी५० ०.१३% वाढला, या आठवड्यात १.८९% आणि सहा महिन्यांत १०% वाढला आहे.

आज सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ वोडाफोन आयडिया (४.२७%), झी एंटरटेनमेंट (३.८३%), इंडस टॉवर (२.६६%) फिनोलेक्स केबल्स (२.६२%), पीटीसी इंडस्ट्रीज (२.००%), सोलार इंडस्ट्रीज (१.८१%), आदित्य बिर्ला फॅशन (१.६३%), एमसीएक्स (१.४८ %), लेमन ट्री हॉटेल (१.३२%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (१.३०%), सुंदरम फायनान्स (१.१४%), वन ९७ (०.८५%), बजाज फायनान्स (०.१८%) समभागात झाली आहे.

आज सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण रॅमको सिमेंट (२.९६%), स्विगी (२.७३%),गॉडफ्रे फिलिप्स (२.४८%), आयडीबीआय बँक (२.१४%), रेमंड लाईफस्टाईल (१.९४%), न्यू इंडिया ॲशुरन्स (१.९१%), सोनाटा सॉफ्टवेअर (१.८३%), जेके सिमेंट (१.६०%), रे लटेल कॉर्पोरेशन (१.५३%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (१.२८%), एचसीएल टेक्नॉलॉजी (१.२०%), अदानी एंटरप्राईजेस (१.०७%), एशियन पेटंस (१.०४%), कल्पतरू प्रोजेक्ट (१.०१%), डीएलएफ (०.८३%), एचडीएफसी बँक (०.८२%), ट्रेंट (०.८१%), टाटा स्टील (०.५६%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.४४%), ओला इलेक्ट्रिक (०.५३%), टाटा मोटर्स (०.४२%), एसबीआय (०.४१%), विप्रो (०.३४%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील सकाळच्या परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'ट्रम्पच्या टॅरिफमुळे बाजाराला येणाऱ्या अडचणी गेल्या ६ दिवसांच्या तेजीला मर्यादित करणाऱ्या बाजारांवर भार टाकतील. जर ऑगस्टमध्ये २५% दंडात्मक टॅरिफ लागू झाला आणि हे होण्याची शक्यता दिसत असेल, तर भारताच्या वाढीवर त्याचा परिणाम २० ते ३० बीपी इतका होणार नाही, तर २५% परस्पर टॅरिफसह त्याहूनही जास्त हो ईल. बाजाराला ते कमी करावे लागेल. बाजारपेठेतील एक महत्त्वाचा ट्रेंड म्हणजे लार्जकॅप्सची कामगिरी चांगली आहे, जी इष्ट आणि मूलभूतपणे न्याय्य आहे. गेल्या एका वर्षात निफ्टी १% ने वाढला आहे, तर निफ्टी मिडकॅप १५० ०.३५% ने आणि निफ्टी स्मॉलकॅप २५००.७% ने खाली आला आहे. हा ट्रेंड मूलभूतपणे न्याय्य आहे आणि तो पुढेही चालू राहण्याची शक्यता आहे. मिडकॅप आयटी आता लवचिकता दाखवत आहे. गुंतवणूकदारांनी आता मूल्यांकनांवर लक्ष केंद्रित करावे.'

सकाळच्या निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,' कालचे चढउतार २५१५३ पातळीपर्यंत वाढल्यानंतर मंदावले आणि गेल्या आठवड्यात आम्ही ठरवलेल्या उ द्दिष्टांच्या अंतरावर होते. दिशात्मक निर्देशकांनी अद्याप वरच्या दिशेने पुढे जाण्यासाठी पुरेशी गती दर्शविली नाही. परंतु थोड्याशा अस्थिरतेच्या अपेक्षांव्यतिरिक्त, सेट अप देखील कोसळण्यासाठी तयार नाही. सध्या, २५०३३-२४९७७ हा नकारात्मक चिन्ह म्हणून वापरला जाऊ शकतो.'

त्यामुळे आज बाजारातील निफ्टी पोझिशनवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवणे गरजेचे असताना बाजारातील नुकसान रोखणे हे सर्वस्वी घरगुती गुंतवणूकदारांच्या (DII Investors) यांच्यावर अवलंबून असू शकते. आज फेडरल व्याजदराबाबत गुंतवणूकदारांनी अनि श्चितता बाळगल्याने युएसच्या बाजारातही काल नुकसान झाले होते. आजही आशियाई बाजारातील संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. यामुळे जीएसटी कपातीच्या व्यतिरिक्त नवा ट्रिगर नसल्यामुळे रशिया व अमेरिका यांच्यातील कच्च्या तेलाच्या करारावर भार तीय गुंतवणूकदार लक्ष ठेवू शकतात.

Comments
Add Comment