गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद! ५१०३ बसेस झाल्या फुल्ल

  28

मुंबई: येत्या २७ ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासीयांची पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या ४४७९ बसेस गट आरक्षणासह एकूण ५१०३ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झालेले आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.


मंत्री सरनाईक म्हणाले की, मुंबईतील कोणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ०७ सप्टेंबर दरम्यान ५२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २३ ऑगस्ट पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.


"गणपती बाप्पा , मुंबईचे कोकणवासीय व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. मुंबईतुन कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्ती पर्यंत फक्त एसटीच कोकणवासीयांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सरवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकर कोकणवासीयांच्या सेवेसाठी एसटी धावत असते". असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.


अर्थात,गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत. अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. तसेच "सर्व गणेशभक्त प्रवाशांचा प्रवास सुखकर होवो!" अशा शुभेच्छा श्री. प्रताप सरनाईक यांनी याप्रसंगी दिल्या आहेत.

Comments
Add Comment

गणपती बाप्पाचा खड्ड्यांनी भरलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास

कोकणात गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविक करतात तारेवरची कसरत मुंबई : गणेशोत्सवाची चाहूल लागली की कोकणातल्या

Online Gaming Regulation Bill 2025: ऑनलाइन गेमिंगवर अखेर बंदी; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने ऑनलाइन मनी गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक मांडले होते. लोकसभा आणि

Monsoon: राज्यासह देशभरात २७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने जोरदार झोडपले होते. त्यानंतर काहीसा

कोकणातील युवकांनी स्फूर्ती घेऊन उच्च पदावर पोहोचावे

खासदार नारायण राणे यांचे आवाहन मुंबई : सार्वजनिक जीवनात व राजकारणात काम करताना मला मिळालेल्या पदांना मी न्याय

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

भटक्या कुत्र्यांवरील 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे राजकारण्यांकडून स्वागत!

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांबाबतच्या आपल्या पूर्वीच्या निर्देशात बदल केला