राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे यावर्षी ST कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार का? हे पाहावं लागणार आहे. कारण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गणतीपूर्वीच वेतन मिळणार असून ST कर्मचाऱ्यांच्या वेतनाचं काय अशी चर्चा सुरु झाली असताना एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
एस टी कर्मचाऱ्यांना देखील पुढील महिन्याचा पगार गणपतीआधीच मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले आहेत.
ST कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर वेतन मिळावं यासाठी सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आजच पगाराच्या फाईल वित्त मंत्रालयाकडे सादर करण्याचे आदेश परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. वित्त विभागाकडून निधी सोमवारपर्यंत मंजूर झाला, तर एस.टी. कर्मचाऱ्यांना सोमवारी म्हणजे (25 ऑगस्ट) किंवा मंगळवारी (26 ऑगस्ट) पगार मिळण्याची शक्यता आहे.
अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच एस.टी. कर्मचाऱ्यांना वेळेत आणि सणाच्या आधी पगार मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात याबाबतची हालचाल सुरु होणार असून एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.