दक्षिण अमेरिकेत ८ रिश्टर क्षमतेचा भूकंप


वॉशिंग्टन डीसी : भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सात वाजून ४६ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेत ८.० रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू अंटार्क्टिकाच्या दक्षिणेकडे ड्रेक पॅसेज या सागरी भागात १० किमी खोलवर होता. भूकंपानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी रशियात ९ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला होता. त्यानंतर आता दक्षिण अमेरिकेत ८ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला आहे. 


दक्षिण अमेरिकेत झालेल्या ८.० रिश्टर क्षमतेच्या भूकंपामुळे नेमकी किती जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे याबाबतची अधिकृत आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही. पण सुरुवातीच्या अहवालांनुसार, फारसे नुकसान झालेले नाही. विरळ लोकसंख्येच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नुकसान कमी असल्याचे वृत्त आहे. 



Comments
Add Comment

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार

गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा