
वॉशिंग्टन डीसी : भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सात वाजून ४६ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेत ८.० रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू अंटार्क्टिकाच्या दक्षिणेकडे ड्रेक पॅसेज या सागरी भागात १० किमी खोलवर होता. भूकंपानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी रशियात ९ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला होता. त्यानंतर आता दक्षिण अमेरिकेत ८ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला आहे.
दक्षिण अमेरिकेत झालेल्या ८.० रिश्टर क्षमतेच्या भूकंपामुळे नेमकी किती जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे याबाबतची अधिकृत आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही. पण सुरुवातीच्या अहवालांनुसार, फारसे नुकसान झालेले नाही. विरळ लोकसंख्येच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नुकसान कमी असल्याचे वृत्त आहे.