सातारा : पावसाचा जोर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर, सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

  26

गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी अखेर पावसाचा जोर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. कोयना, पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.


सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू आहे. मात्र कालपासून जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे.कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग कमी केल्याने पाटण सह परिसरातील पूर परिस्थिती ओसरली असून जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. सातारा, वाई,कराड या भागातील नद्यांची पाणी पातळी घट झाली आहे.


मात्र या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वाटाणा घेवडा बटाटा यांसह कडधान्याची ही नुकसान झाल्यामुळे या पिकाच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे मत देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.


त्यामुळे तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामे करण्यात यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. सध्या साताऱ्यातील वाहतूक सुरळीत सुरु असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

Comments
Add Comment

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

भररस्त्यात हातात चाकू घेऊन मास्क मॅनची दहशत ! नागरिक भयभीत

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या समस्या वाढत आहेत . एकामागोमाग एक अशा गुन्हेगारी घटना पुण्यात घडत असतात .

पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा वाद अखेर मिटला !

पुणे : पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकीवरून पेटलेला वाद आता अखेर मिटला आहे . काही मंडळांनी मानाच्या गणपतीच्या

Crime News : साडीने गळफास अयशस्वी मग गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून स्फोट; CA विद्यार्थ्याच्या आत्महत्येने महाराष्ट्र हादरला

छत्रपती संभाजीनगर : जवाहरनगरमधील न्यू शांतीनिकेतन कॉलनी येथे बुधवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. आई व

Beed Crime :उपमुख्यमंत्र्याच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला, नेमकं प्रकरण काय?

बीड:  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला करण्यात

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट, मुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांना फोन

भाजपकडून एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. राधाकृष्णन यांनी उमेदवारी