Friday, August 22, 2025

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सहा दिवसानंतर तेजीला ब्रेक, एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान! सेन्सेक्स निफ्टीत घसरण

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सहा दिवसानंतर तेजीला ब्रेक, एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान! सेन्सेक्स निफ्टीत घसरण

मोहित सोमण: अखेरच्या सत्रात आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सहा दिवसांची वाढ अखेर थांबल्यानंतर आज मोठी घसरण झाली. आज नफा बुकिंगमध्ये वाढ झाली असली तरी बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांची एकाच दिवसात २ लाख कोटींची गुंतवणूक पाण्यात गेली आहे. सेन्सेक्स ६९३.९६ अंकाने घसरत ८१३०६.८५ पातळीवर स्थिरावला आहे. निफ्टी ५० २१३.६५ अंकाने घसरत २४८७०.१० पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ६५९.९१ अंकाने व बँक निफ्टीत ६०६.०५ अंकांनी घसरण झाली आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील, विप्रो, इन्फोसिस अशा जवळपास सगळ्याच हेवी वेट शेअरमध्ये गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले.

सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अखेरच्या सत्रात अनुक्रमे ०.२५%,०.३५% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१४%,०.२६% घसरण झाली आहे. बाजार बंद होताना निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळच्या सत्राप्रमाणे बहुतांश निर्देशांकात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण पीएसयु बँक (१.१२%), एफएमसीजी (१.००%), तेल व गॅस (०.८३%),आयटी (०.७९%) निर्देशांकात घसरण झाली आहे. सर्वाधिक वाढ आज मिडिया (०.९५%), फार्मा (०.३९%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.६६%) समभागात झाली आहे. सकाळी मर्यादित पातळीवर वाढलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) अखेरपर्यंत ३.१२% उसळल्याने बाजारातील घसरणीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

आज शेअर बाजारातील घसरण दिवसभरात सुरु होती. बड्या ब्लू चिप्स कंपनीच्या शेअरबरोबर मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण कायम राहिल्याने बाजाराला आज आधारभूत पातळी राखता आली नाही. परिणामी बाजार आज घसरले आहे. युएस बाजारातील अस्थिरतेचा फटका कालपासून आशियाई बाजारात परावर्तित झाला. युएस मधील रोजगार आकडेवारीतील तुलनेत महागाईतील आकडेवारीत वाढ होत असल्याने गुंतवणूकदारांना व्याजदरात कपात होईल का हे प्रश्नांकित वाटते. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून टॅरिफ वाढीनंतर फेड गव्हर्नरांवर फेड रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्यासाठी दबाव घातला जात आहे. मात्र सातत्याने दबावाला न जुमानता फेडने आपली स्वायत्तता कायम राखत जून महिन्यात व्याजदरात कपात केली नव्हती. किंबहुना त्यावेळी जेरोमी पॉवेल यांनी केलेले विधान काही दिवसांपूर्वीपर्यंत कायम राखले आहे. बाजारातील संवेदनशील परिस्थिती पाहता आगामी काळातील परिस्थिती व आकडेवारी पाहूनच आगामी निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे भडकलेल्या ट्रम्प यांनी त्यांना हटवण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. अशातच दुसऱ्या गव्हर्नर कुक यांच्यावर 'मॉर्टगेज घोटाळ्याचे आरोप ठेवले होते त्यावर राजीनाम्यासाठी सपशेल नकार कुक यांनी दिला होता. त्यामुळे अमेरिकेच्या प्रशासनातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. अशातच लवकरच सप्टेंबर महिन्यातील व्याजदरात कपात होईल का यावर बाजार निर्णयानंतरच आश्वस्त होऊ शकतो. याचाच परिणाम म्हणून अमेरिका,युरोपियन बाजारासह आशियाई बाजारातील निर्देशांकात घसरण झाली होती. मात्र घरगुती गुंतवणूकदारांच्या जीएसटी कपातीवरील 'सेलिब्रेशन' मुळे व मजबूत फंडामेंटलमुळे भारतीय शेअर बाजारात वाढ झाली होती. आज मात्र अस्थिरतेच्या तोंडावर शेअर बाजारासह सोन्याच्या निर्देशांकातही घसरण झाली आहे.

संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक निर्देशांकात ०.२८% घसरण झाली होती. डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही घसरण कायम राहिल्याने बाजारातील सोन्यात घसरण मर्यादित राहिली. दुसरीकडे चांदीत मात्र जागतिक मागणीमुळे वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या जागतिक WTI Futures निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०६% घसरण झाली आहे. Brent Futures निर्देशांकात ०.१५% घसरण झाली आहे. संध्याकाळपर्यंत आशियाई बाजारातील निकेयी (०.०३%), तैवान वेटेड (०.८३%), जकार्ता कंपोझिट (०.४१%) बाजारात घसरण झाली आहे. तर स्ट्रेट टाईम्स (०.५२%), हेगसेंग (०.७४%), कोसपी (०.८४%), शांघाई कंपोझिट (१.४३%) बाजारात वाढ झाली आहे.

युरोपियन बाजारातील तर एफटीएसई (०.०७%), सीएससी (०.२८%), डीएएसी (०.१७%) बाजारात वाढ झाली आहे. अमेरिकेन बाजारातील सुरूवातीच्या कलात एस अँड पी ५०० (०.४०%), नासडाक (०.३४%) बाजारात घसरण झाली असून डाऊ जोन्स (०.३७%) बाजारात वाढ झाली आहे. बाजारातील माहितीनुसार, बीएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४५६.३ कोटींवरुन ४५४ कोटींवर घसरले आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ नेटवेब टेक्नॉलॉजी (१२.४२%), वोडाफोन आयडिया (७.९४%), आदित्य बिर्ला फॅशन (७.४०%), गोदावरी पॉवर (६.९१%), झी एंटरटेनमेंट (५.५२%), झेन टेक्नॉलॉजी (४.९२%), पुनावाला फायनान्स (३.२७%), भारती हेक्साकॉम (३.२३%), पीटीसी इंडस्ट्रीज (२.९७%), सोलार इंडस्ट्रीज (१.८१%), लेमन ट्री हॉटेल (१.८७%), वन ९७ (१.५३%), सारेगामा इंडिया (१.४३%), कोफोर्ज (१.१३%), टाटा कम्युनिकेशन (०.९८%), मारूती सुझुकी (०.४७%), एमसीएक्स (०.४२%), सीडीएसएल (०.३१%), मुथट फायनान्स (०.१८%) समभागात झाली आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण गॉडफ्रे फिलिप्स (५.१४%), जेके सिमेंट (४.११%), इंडिया सिमेंट (३.७०%),रॅमको सिमेंट (३.४३%), होडांई मोटर्स (३.३५%), ओला इलेक्ट्रिक (३.३२%), आयसीआयसीआय लोंबार्ड (२.८७%), मदर्सन (२.८०%), भारत फोर्ज (२.६९%), आयडीबीआय बँक (२.६४%), एलआयसी हाउसिंग फायनान्स (२.४८%), माझगाव डॉक (२.४४%), एशियन पेटंस (२.४२%), अदानी एंटरप्राईजेस (२.२०%), किर्लोस्कर ब्रदर्स (२.२२%), रेलटेल (२.११%), सिटी युनियन बँक (२.१०%), आयआयएफएल फायनान्स (१.८८%), अदानी एनर्जी (१.८४%), टाटा स्टील (१.८३%), रेमंड (१.८७%), आयटीसी (१.७९%), टीसीएस (१.५७%), फेडरल बँक (१.५५%), अदानी पोर्टस (१.५१%), कोटक महिंद्रा बँक (१.५५%), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.०९%), टेक महिंद्रा (१.०७%), कॅनरा बँक (१.०३%), इंडसइंड बँक (०.९६%), टाटा मोटर्स (०.७४%), विप्रो (०.४७%), न्यूजेन सॉफ्टवेअर (०.५३%), एमआरएफ (०.४२%), बजाज फायनान्स (०.१२%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'भारतीय शेअर बाजार आज घसरणीसह बंद झाला, ज्यामुळे सहा सत्रांचा विजयी सिलसिला संपला आणि गेल्या तीन दिवसांत जमा झालेला नफा पुसून टाकला गेला. जॅक्सन होल परिसंवादात अमेरिकन फेड अध्यक्षांच्या भाषणापूर्वी गुंतवणूकदारांची भावना सावध झाली, ज्यामध्ये जागतिक तरलता दृष्टिकोन आणि भविष्यातील व्याजदर मार्गाबद्दल महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी मिळण्याची अपेक्षा आहे. रशियाविरुद्धच्या भूमिकेत भारतावर व्यापार शुल्काचा वापर धोरणात्मक साधन म्हणून अमेरिकेने केल्याने संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये लवकरच चिंता निर्माण झाली आहे. तथापि, मजबूत देशांतर्गत निर्देशक समर्थन देतात: पीएमआयने विक्रमी उच्चांक गाठला आहे आणि अलीकडेच प्रस्तावित अप्रत्यक्ष कर सवलतींमुळे उपभोग वाढेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे भारताची आर्थिक लवचिकता अधोरेखित होईल.'

आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'स्थिर वाढीनंतर, शुक्रवारी निफ्टी थांबला, ज्यामुळे पुढील पायरीच्या वर जाण्यापूर्वी थोड्या काळासाठी एकत्रीकरण सूचित होते. निर्देशांक ५० ईएमए (Exponential Moving Average EMA) च्या वर टिकून आहे, ज्यामुळे अल्पकालीन अपट्रेंडला बळकटी मिळते. नकारात्मक बाजूने, समर्थन २४,८०० वर आहे; या पातळीच्या वर राहिल्याने ट्रेंड अबाधित राहतो आणि २५०००-२५२५० पातळीच्या दिशेने प्रगती होण्याची शक्यता असते.'

आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'आठवड्यात सोन्याच्या किमतींमध्ये काही प्रमाणात घट झाली. रुपयाच्या वाढीमुळे आणि गेल्या आठवड्यात COMEX सोन्याच्या $३४०० वरून घसरणीमुळे देशांतर्गत किमतींवर दबाव निर्माण झाला. घसरण झाली असली तरी, भावना मोठ्या प्रमाणात सकारात्मक राहते कारण आगामी फेड बैठकीत दर कपात होण्याची अपेक्षा आहे, अलिकडच्या अमेरिकन पेरोल डेटा कमकुवत आर्थिक संकेत दर्शवितो. गुंतवणूकदार आता जॅक्सन होलमधील पॉवेलच्या भाषणाकडे जवळच्या काळात भावनांना मार्गदर्शन करणारी महत्त्वाची घटना म्हणून पाहत आहेत. तांत्रिक आघाडीवर, समर्थन ९८५००–९८००० पातळी वर ठेवले आहे, तर प्रतिकार (Resistance) १०१५०० –१०२००० पातळीवर आहे, धोरण स्पष्टतेपूर्वी पक्षपात किंचित तेजीत ठेवला आहे.'

आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'जीएसटी कपातीच्या बातम्यांमुळे सुरुवातीला तेजी झाल्यानंतर रुपया ०.२५ ने कमकुवत झाला आणि ८७.५० वर स्थिरावला, परंतु सततचा एफआयआय विक्रीचा दबाव भावनांवर पडल्याने तो वेग कमी झाला. बाजाराचे लक्ष आता जॅक्सन होल येथे पॉवेलच्या भाषणाकडे वळले आहे, जे डॉलर निर्देशांकाचे मार्गदर्शन करेल आणि त्यामुळे रुपयाच्या दिशेने परिणाम करेल अशी अपेक्षा आहे. कच्च्या मालाच्या किमतीतील हालचाली आणि जागतिक जोखीम भावना देखील जवळच्या काळातील ट्रेंड निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. तांत्रिकदृष्ट्या, रुपयाला ८७.७५ च्या जवळ तात्काळ आधार आहे, तर ८७.१५ च्या आसपास प्रतिकार दिसून येत आहे, जो पुढे अस्थिर परंतु श्रेणी-बाउंड व्यापार सूचित करतो.'

त्यामुळेच आज बाजारातील गुंतवणूकदारांचे नुकसान झाले असताना उद्या क्षेत्रीय विशेष निर्देशांकातील परिणामांसह मिड स्मॉल कॅप शेअर्समधील कामगिरी महत्वपूर्ण ठरेल. जेरोमी पॉवेल यांच्या भाषणाचा परिणाम होणे अपेक्षित असून पुढील जीएसटी कपातीच्या फायदा कंज्यूमर ड्युरेबल्स, एफएमसीजी,ऑटो, फायनांशियल क्षेत्रांना होऊ शकतो मात्र तरीही जागतिक अस्थिरता कायम असल्याने भारतीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक टिकवल्यास परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काढून घेतलेल्या गुंतवणूकीचा फटका नियंत्रित करता येऊ शकतो. उदया सकाळच्या सत्रातील दिशा उद्याच्या गिफ्ट निफ्टीतही स्पष्ट होईल. तरी गुंतवणूकदारांना तज्ञांकडून नफा बुकिंग व संयमाचा सल्ला दिला जात आहे.

Comments
Add Comment