
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत येत्या रविवारी मुख्य व ट्रान्सहार्बर उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुख्य मार्गावर माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ वाजेपासून दुपारी ३ . ५५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल .
या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३. ३२ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
ठाणे येथून सकाळी ११.०७ वाजता ते दुपारी ३ . ५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील. त्यानंतर माटुंगा येथे पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि निर्धारित स्थानकावर या गाड्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.
ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी व नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी संध्याकाळी ४. १० वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक काळात वाशी व नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी संध्याकाळी ४ . ०७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी / नेरुळ / पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा तसेच पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी १०.२५ ते संध्याकाळी ४. ०९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या अप मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
रेल्वे ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टम आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शनिवार मध्यरात्री वसई रोड यार्ड येथील मालगाड्यांवर रात्री १२. ३० ते दुपारी ४:३० पर्यंत जंबो ब्लॉक घेतला जाईल. या कारणात्सव रविवारी २४ ऑगस्ट रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसा कोणताही ब्लॉक नसेल .