मोहित सोमण:एल अँड टी फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये सकाळच्या सत्रात २% पर्यंत वाढ झाली आहे. सकाळी १२.०१ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअरने १.५७% उसळी मारल्याने शेअर २२५.१५ रूपयांवर पोहोचला आहे. एनबीएफसी (विना बँकिंग वित्तीय संस्था NBFC) असलेल्या एल अँड टी फायनान्स लिमिटेडने गुगल पे सोबत भागीदारी जाहीर केली होती त्याचा फायदा आज कंपनीच्या शेअर्समध्ये दिसून येत आहे.आता एल अँड टी फायनान्सकडून कर्जदाराला वैयक्तिक कर्ज (Personal Loan) थेट गुगल पे वरून काढता येणार आहे. कंपनीच्या या नव्या फिटनेक तंत्रज्ञान भागीदारीमुळे आज २२७ रूपये प्रति शेअर या नव्या उच्चांकावर (Record High) वर पोहोचला आहे. ग्राहकांना झटपट वित्तीय गरज भागवण्यासाठी, सोयीस्कर कर्ज वितरणासाठी, व जलद अनुपालन साठी (Compliance), कमीत कमी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एल अँड टी फायनान्सने गुगल पे बरोबर भागीदारीचा निर्णय घेतला होता कंपनीने यावर भा ष्य करताना 'ही भागीदारी एनबीएफसीच्या उत्पादन विविधीकरण धोरणाशी सुसंगत आहे आणि ग्राहकांसाठी जलद, अखंड आणि डिजिटल पद्धतीने कर्ज अधिक सुलभ बनवते' असे प्रसारमाध्यमांना म्हटले होते. ही भागीदारी केवळ सुविधा वाढविण्यासाठीच नाही तर संपूर्ण भारतात डिजिटल आर्थिक समावेशनाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, ग्राहकांना जबाबदार कर्ज देऊन त्यांच्या आर्थिक आकांक्षा पूर्ण करण्यास सक्षम बनवेल.' असेही कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
आर्थिक वर्ष २६ मधील पहिल्या तिमाहीत (आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत), एल अँड टी फायनान्सने ७०१ कोटींचा एकत्रित निव्वळ नफा (Consolidated Net Profit) नोंदवला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत ६८६ कोटी होता, जो २% वाढला आहे. यापूर्वी एमएसएमईसाठी कर्ज उपलब्धता मजबूत करण्यासाठी इंडसइंड बँकेनेही एनएसआयसीसोबत सामंजस्य करार (MoU) नुकताच केला आहे. इंडसइंड बँकेने एमएसएमई मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारत सरकारच्या उपक्रम नॅशनल स्मॉल इंड स्ट्रीज कॉर्पोरेशन (एनएसआयसी) सोबत सामंजस्य करार (एमओयू) केला होता. आता एल अँड टी फायनान्सने ग्राहकांना जलद सेवा देण्यासाठी हा निर्णय घेतला.
आपल्या भागीदारीबद्दल बोलताना एल अँड टी फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुदीप्त रॉय म्हणाले आहेत की,'वित्तीय सेवांचे भविष्य म्हणजे सामर्थ्यवान, ग्राहक-केंद्रित परिसंस्था निर्माण करणे. गुगल पेसोबतच्या आमच्या सहकार्यामुळे आम्ही भारतीय ग्राहकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्याची क्षमता वाढवत आहोत. आम्ही आमची वित्तीय उत्पादने उच्च सहभाग असलेल्या परिसंस्थांमध्ये एकत्रित करत आहोत, ज्यामुळे वितरण मॉडेल अधिक कार्यक्षम होईल आणि आधुनिक ग्राहकांच्या अपेक्षांना अनुरूप राहील.'
या भागीदारीबद्दल एल अँड टी फायनान्स लिमिटेडचे चीफ एक्झिक्युटिव्ह अर्बन अनसिक्योर्ड अँसेट्स, पेमेन्ट्स अँड डिजिटल पार्टनरशिप्स मनीष कुमार गुप्ता म्हणाले आहेत की,'गुगल पेसोबतची भागीदारी आमच्यासाठी डिजिटल नेटिव्ह कर्जदा ता होण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एलटीएफमध्ये आमचे लक्ष ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर आहे. गुगल पेचा शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यापक वापरकर्ता वर्ग आमच्या ‘लक्ष्य’ धोरणाशी सुसंगत आहे. या सहकार्यामुळे वैयक्तिक कर्ज क्षेत्रातील आमची स्थिती आणखी मजबूत होईल असा आम्हाला विश्वास आहे.'
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये एलटीएफने फोनपे, क्रेड आणि अँमेझॉन पे यांसारख्या फिनटेक प्लॅटफॉर्मसोबत भागीदाऱ्या जाहीर केल्या होत्या. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि ग्राहक प्राप्ती चॅनेल्ससोबतच्या भागीदाऱ्यांमुळे कंपनीच्या वैयक्तिक कर्ज व्यवसायाला गती मिळाली आहे. ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत (Q1FY26) कर्जवाढ (Loan Growth) ४१% ने वाढून ९३८३ कोटी रूपये इतकी झाली तर या तिमाहीतील वितरण ६५% वाढून (Distribution) १९४२ कोटीवर पोहोचले होते. विविध भागीदाऱ्या, नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये विस्तार आणि ग्राहक धारणा यांसारख्या घटकांमुळे वैयक्तिक कर्ज व्यवसायात सातत्याने वाढ होईल अशी अपेक्षा आहे. या सहकार्यामुळे एलटीएफची वित्तीय तज्ज्ञता आणि गुगल पेचा व्यापक वापर व सुलभ इंटरफेस एकत्र येऊन ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सोपे आणि विश्वासार्ह कर्ज उपाय उपलब्ध होतील. ही भागीदारी केवळ सोयीसाठी उपयुक्त ठरणार नाही तर भारतातील डिजिटल वित्तीय समावेशन वाढविण्यातही महत्त्वाची भूमिका बजावेल असा दावा एल अँड टी फायनान्सने केला आहे.